'याचं उत्तर एकनाथ शिंदेंच देऊ शकतात'; मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचे सूचक विधान
गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे आणि या प्रश्नासाठी आंदोलनं व उपोषणं करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आपल्या मागणीसाठी मुंबईत धडकले आहेत. शुक्रवारी (२९ ऑगस्ट) त्यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, हजारो मराठा आंदोलकांच्या उपस्थितीमुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
या घडामोडींवर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रसारमाध्यमांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी उत्तर देताना म्हटले, “तुमच्या आणि लोकांच्या मनातले सर्व प्रश्न यांची उत्तरं केवळ एकच व्यक्ती देऊ शकते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच या घटनांवर योग्य प्रतिक्रिया देऊ शकतात.”
Thane News : अतिधोकादायक इमारती तातडीने रिकाम्या कराव्यात; मनपा आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश
मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत माध्यमांनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. मराठा विरुद्ध ओबीसी या आरक्षणाच्या वादाकडे आपण कसं पाहता? असा प्रश्न विचारण्यात आला.यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “ या सगळ्या गोष्टींची उत्तरे तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतील, ते तुमच्यासमोर येतील तेव्हा तुम्ही हे त्यांनाच विचारा. आरक्षणाबाबत माजी भूमिका काय आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता ते सगळं जुनं झालं. मात्र, सध्याच्या घटनांवर केवळ एकनाथ शिंदे हेच बोलू शकतात.”
मराठा आंदोलकांमुळे मुंबईत मोठी वाहतूक कोंडी झाली होती, त्याचा मुंबईकरांना त्रास होतोय, असा प्रश्न उपस्थित केला असता राज ठाकरे म्हणाले, मुंबईकरांना त्रास होतोय वगैरे गोष्टींवर फक्त एकनाथ शिंदेच बोलू शकतात. मागच्या वेळी एकनाथ शिंदे हेच नवी मुंबईला गेले होते ना? त्यांनी नवी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला होता. मग मराठा आंदोलक मुंबईत परत का आले. असा प्रतिप्रश्न करत राज ठाकरेंनी या सर्व गोष्टींची उत्तरं केवळ एकनाथ शिंदे देऊ शकतात.” असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कोर्टात चेंडू टाकला.
ऐन गणेशोत्सवात Allu Arjun ला बसला धक्का, अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावलं
दरम्यान, राज ठाकरेंची ही प्रतिक्रीया, मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात. त्यांचे हे विधान सूचक मानले जात आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर गंभीर आरोप केला. “महायुती सरकारमध्ये तीन गट आहेत. त्यामध्ये शिंदे गटाचा विषय वेगळा आहे. फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे आंदोलकांना वेगळ्या प्रकारे मदत करत आहेत.” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच, “देवेंद्र फडणवीस यांची भूमिका परशुराम महामंडळाच्या संदर्भात वेगळी आहे, तर अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ राहिले आहेत. त्यांची कोणतीही ठोस भूमिका समोर आलेली नाही. अशा परिस्थितीत सरकारकडून राजकीय इच्छाशक्ती अपेक्षित तरी कुठून?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.