Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर! प्रवासी घरातून बाहेर पडले अन् अडकले, मध्य आणि हार्बर रेल्वेला लेटमार्कचा फटका

Mumbai Local Train Update News in Marathi : शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइन वरील वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरू आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 16, 2025 | 12:06 PM
मध्य आणि हार्बर रेल्वेला लेटमार्कचा फटका (फोटो सौजन्य-X)

मध्य आणि हार्बर रेल्वेला लेटमार्कचा फटका (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Mumbai Local Train Update News in Marathi : मुंबईत शुक्रवारी (15 ऑगस्ट) रात्रीपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे.ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने अनेक लोकला लेटमार्कचा फटका बसला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल १५-२० मिनिटे उशिराने धावत आहेत. दरम्यान मध्य रेल्वे मार्गावर गाड्या सुमारे १५ मिनिटे उशिराने धावत आहेत, ज्यामुळे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होत आहे. माहिती देताना, कुर्ला आणि दादर स्थानकांदरम्यान पाणी साचल्याने वाहतूक उशिराने धावत आहे.

 विक्रोळीतील दरड कोसळली; वडील-मुलीचा मृत्यू, आई-मुलगा गंभीर जखमी

रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, मध्य रेल्वे मार्गावर गाड्या सुमारे १५ मिनिटे उशिराने धावत आहेत, ज्यामुळे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होत आहे. माहिती देताना, कुर्ला आणि दादर स्थानकांदरम्यान पाणी साचल्याने लोकल उशिराने धावत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मते, पुढील ३-४ तासांत मुंबईतील रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर जिल्ह्यांमधील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

दादर आणि वांद्रे स्थानकांवर रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. हार्बर मार्गावर टिळक नगर आणि कुर्ला दरम्यान पाणी साचल्याने लोकल गाड्यांची वाहतूक मंदावली. प्रवाशांना तासनतास वाट पहावी लागत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी जारी केलेल्या ऑरेंज अलर्टला शनिवारी रेड अलर्टमध्ये वाढवले. मुंबई पोलिसांनी लोकांना अत्यंत आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे. पोलिसांनी इशारा दिला आहे की, ‘अनेक ठिकाणी पाणी साचले आहे आणि दृश्यमानता कमी आहे.

विमान वाहतुकीवर परिणाम

मुंबई विमानतळावर सततच्या पावसामुळे धावपट्टी आणि टॅक्सीवे पाण्याखाली गेले होते. ज्यामुळे अनेक उड्डाणांना विलंब झाला. प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला आणि विमान कंपन्यांना अलर्ट जारी करावा लागला. इंडिगोने प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी वेबसाइट किंवा अॅपवर त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचा आणि वाहतूक आणि पाणी साचल्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त वेळेसह विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला दिला आहे.

विक्रोळीमध्ये भूस्खलन, दोघांचा मृत्यू

दरम्यान, विक्रोळी (पश्चिम) येथील जन कल्याण सोसायटी परिसरात भूस्खलन झाले, ज्यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आणि २ जण जखमी झाले. मदतकार्य सुरू आहे. बीएमसीनुसार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० ते १६ ऑगस्ट रोजी सकाळी ५:३० वाजेपर्यंत विक्रोळी येथे २४८.५ मिमी, सांताक्रूझ येथे २३२.५ मिमी, सायन येथे २२१ मिमी, जुहू येथे २०८ मिमी, वांद्रे येथे १७३ मिमी, भायखळा येथे १५८.५ मिमी आणि कुलाबा येथे ७०.४ मिमी पावसाची नोंद झाली.

मुंबईत फक्त घरेच नाही तर आता स्वस्त दुकाने खरेदी करू शकता, जाणून घ्या म्हाडाचा ई-लिलाव कधी आणि कसा होईल?

Web Title: Mumbai local train update services disrupted on central and harbour lines due to heavy rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 12:06 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai Local
  • rain

संबंधित बातम्या

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर
1

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

देशातील सर्वात महागडी घरे मुंबईत! 100 कोटी किमतीचे फ्लॅटची सहज होतेय विक्री
2

देशातील सर्वात महागडी घरे मुंबईत! 100 कोटी किमतीचे फ्लॅटची सहज होतेय विक्री

MHADA Mumbai Lottery: घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा काढणार ५ हजार घरांसाठी लॉटरी
3

MHADA Mumbai Lottery: घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण! म्हाडा काढणार ५ हजार घरांसाठी लॉटरी

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.