Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईच्या समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा आता रोखला जाणार; मालाडमध्ये ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प सुरू

मुंबईतील नदी-नाल्यांमधून अरबी समुद्रात जाणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याला आळा घालण्यासाठी मालाड खाडीत 'इंटरसेप्टर' पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे समुद्रात पोहोचण्यापूर्वीच तरंगता कचरा अडवला जाणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 26, 2026 | 03:00 PM
मुंबईच्या समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा आता रोखला जाणार; मालाडमध्ये 'इंटरसेप्टर' प्रकल्प सुरू

मुंबईच्या समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा आता रोखला जाणार; मालाडमध्ये 'इंटरसेप्टर' प्रकल्प सुरू

Follow Us
Follow Us:
  • मालाड खाडीत अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर’ तंत्रज्ञानाच्या मदतीने नदी-नाल्यांतील कचरा समुद्रात जाण्यापूर्वीच अडवला जाणार.
  • या प्रायोगिक प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नसून अनेक संस्थांचे संयुक्त सहकार्य आहे.
  • प्रकल्पामुळे सागरी प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना नदी, नाले आणि समुद्रात कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईतील नदी आणि नाल्यांमधून दरवर्षी अरबी समुद्रात वाहून जाणाऱ्या प्लास्टिक तसेच इतर तरंगत्या कचऱ्याची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी मालाड खाडी येथे ‘द ओशन क्लीनअप’ या जागतिक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ‘इंटरसेप्टर’ पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा महत्त्वपूर्ण पायलट प्रकल्प महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई महापालिका, ‘प्लास्टिक फिशर’, ‘युनायटेड वे मुंबई’ आणि ‘द ओशन क्लीनअप’ या संस्थांच्या संयुक्त सहकायनि राबवला जात आहे. मालाड आणि ट्रॉम्बे खाडी परिसरात आधुनिक ‘इंटरसेप्टर’ तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्रात जाण्यापूर्वीच नदी-नाल्यांमधील कचरा अडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. ‘द ओशन क्लीनअप’ या संस्थेच्या सखोल अभ्यासानुसार, मुंबई शहरातून दरवर्षी सुमारे ५० लाख किलो प्लास्टिक कचरा वाहून अरबी समुद्रात जातो. या अवाढव्य प्रमाणाला आळा घालून सागरी पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

Mira-Bhayandar News: जागतिक कांदळवन दिनी भाईंदरमध्ये तरुणांचे स्वच्छता अभियान; शासकीय विभाग मात्र गैरहजर

महानगरपालिकेला करावा लागणार नाही खर्च

या प्रकल्पाच्या प्रायोगिक टप्यात ‘इंटरसेप्टर’ प्रणालीद्वारे कचरा संकलित करण्यासाठी मुंबई पालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही. या मोफत सेवेमुळे सागरी पर्यावरणाचे रक्षण होण्यासोबतच पालिकेच्या सार्वजनिक निधीची मोठी बचत होण्यास मदत होणार आहे. अलीकडेच झालेल्या मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या उधाणाव्या भरती दरम्यान जुहू किना-यावर हजारो टन प्लास्टिक आणि कचरा वाहून आल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले होते. नाल्यामधून समुद्रात गेलेला कचरा भरतीच्या वेळी पुन्हा किनाऱ्यावर येतो, ज्यामुळे सागरी जीवसृष्टी चोक्यात येतेच, शिवाय हा कचरा किनाऱ्यावरून हटवण्यासाठी पालिकेला कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागतो, अशा परिस्थितीत कचरा समुद्रात पोहोचण्यापूर्वीच नदी-नाल्यांमध्ये अडवणारी ही ‘इंटरसेप्टर यंत्रणा अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Mumbai Local Update: लोकलमधील चोरी, हाणामाऱ्या रोखण्यासाठी सर्व डब्यांवर सीसीटीव्हीची नजर

नदी, नाले, समुद्रात कचरा न फेकण्याचे आवाहन

भाजपचे नगरसेवक तेजिंदरसिंग लिवाना यांनी नुकतीच या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या दर्जाचा आणि प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी तेजिंदरसिंग तिवाना म्हणाले की, ‘एक लोकप्रतिनिधी म्हणून केवळ सूचना देणे किंवा प्रकल्पांचे उद्‌घाटन करून मोकळे होची पुरेसे नसून, कामाव्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्याची गुणवत्ता तपासणे आणि जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक मालाड घडवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला, तसेब मुंबईकरांना आवाहन करताना त्यांनी नदी, नाले किया थेट समुद्रात कचरा न फैकता ओला व सुका कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावण्याची सूचना केली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

 

Web Title: Mumbai malad interceptor project to stop plastic waste from entering arabian sea

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • environment
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले
1

IIT Bombay Student Suicide : ‘अजून किती विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागणार?’ अभिजीत दीपके सरकारवर बरसले

राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट? टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या प्रशासनाच्या सूचना
2

राज्यात पाणीटंचाईचे भीषण संकट? टंचाई कृती आराखडा तयार करण्याच्या प्रशासनाच्या सूचना

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’
3

Disha Salian Case : आदित्य ठाकरेंनी अखेर मौन सोडले; म्हणाले, ‘दिशा सालियनला मी कधीही…’

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी
4

मोठी बातमी! राज्यातील तरुणांसाठी खूशखबर; ‘रोजगार महाकुंभ’द्वारे हजारो नोकऱ्यांची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.