
Ajay Devgn: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
अजय देवगणने आपला जुहूचा बंगला भाड्याने दिला आहे. तिथे एक मोठा स्पा आणि सलून सुरू होणार आहे. फ्लोरियन ह्युरेल नावाच्या कंपनीला त्याने हा बंगला पाच वर्षांसाठी दिला आहे आणि याचा करार तब्बल 10.61 कोटी रुपयांचा आहे. पण हेच भाड्याने देणे सोसायटीच्या लोकांना आणि BMC ला पटले नाही.
अजय देवगणचा बंगला कपोल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आहे. तिथल्या रहिवाशांनीच BMC कडे तक्रार केली. त्यांचे म्हणणे आहे की हा रेसिडेंतील एरिया असल्याने इथे स्पा आणि सलून सुरू झाले तर रोज शेकडो बाहेरचे लोक येतील. गाड्यांची गर्दी होईल, पार्किंगचा प्रॉब्लेम होईल, आवाज वाढेल आणि सुरक्षिततेचा प्रश्न पण येईल. आम्हाला हे नको आहे.
तक्रार आल्यानंतर BMC च्या K-West विभागाने लक्ष घातले. त्यांनी जाऊन बघितले तर आतमध्ये बांधकाम सुरू होते. भिंती पाडणे, नवीन पार्टिशन करणे, खिडक्यांमध्ये बदल करणे अशी कामे सुरू होती. पण या कामासाठी BMC ची कोणतीही परवानगी घेतली नव्हती.
BMC ने 10 सप्टेंबर 2026 ला अजय देवगणला नोटीस पाठवली. ती नोटीस 354A कायद्याअंतर्गत होती. त्यात स्पष्ट असे लिहिले होते की, काम त्वरि थांबबा, तुमच्याकडे असलेली कागदपत्रे आणि परवाने आम्हाला पुन्हा दाखवा. परंतू नोटीस दाखवले त्यांतर सुद्धा काम सुरु होते. अखेर BMC ने कारवाईचा निर्णय घेतला. त्यांची टीम आली आणि अनधिकृत बांधकामाचा काही भाग तोडून टाकला.
या सगळ्या प्रकरणावर अजय देवगण स्वतः काहीच बोलला नाही. पण त्याच्या टीमच्या जवळच्या लोकांनी सांगितले की आम्ही सगळ्या परवानग्या घेतल्या आहेत. जे काही करतोय ते कायदेशीरच आहे. सोसायटीचे आरोप चुकीचे आहेत असे त्यांनी म्हटले आहे.पण BMC चे म्हणणे वेगळे आहे. त्यांच्या मते बंगला हा राहण्यासाठी आहे, त्याचा व्यावसायिक वापर करायचा असेल तर वेगळ्या परवानग्या लागतात. त्या घेतल्याच नाहीत.सध्या अजय देवगण त्याच्या दृश्यम 3 सिनेमामुळे खुश आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. पण एकीकडे सिनेमा हिट होत असताना दुसरीकडे बंगल्यामुळे तो चर्चेत आला आहे. आता BMC पुढे काय कारवाई करते आणि हा वाद कसा मिटतो हे बघावे लागेल.
Ans: बंगल्यात कथित अनधिकृत बांधकाम सुरू असल्याच्या प्रकरणात BMC ने कारवाई केल्याचे वृत्त आहे.
Ans: अजय देवगणचा संबंधित बंगला मुंबईतील जुहू परिसरात आहे.
Ans: संबंधित बंगल्यात स्पा आणि सलून सुरू करण्याची योजना असल्याचे सांगितले जात आहे.