Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालमत्ता कराचे जुने रेकॉर्ड होणार डिजिटल; मुंबई महापालिका नेमणार ५४ डेटा एंट्री ऑपरेटर

मुंबई महापालिकेने मालमत्ता कराशी संबंधित जुने आणि प्रलंबित रेकॉर्ड डिजिटल करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. या उपक्रमामुळे कर व्यवस्थापन अधिक पारदर्शक होण्यासोबतच नागरिकांनाही विविध सेवांचा जलद लाभ मिळणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 21, 2026 | 11:01 AM
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Follow Us
Follow Us:
  • २०१० पासूनची प्रलंबित मालमत्ता कर नोंदी संगणकीकृत करून अद्ययावत केल्या जाणार आहेत.
  • २४ प्रभाग आणि ३ विभागीय कार्यालयांमध्ये ५४ डेटा एंट्री ऑपरेटरची कंत्राटी नियुक्ती होणार आहे.
  • डिजिटल रेकॉर्डमुळे कर आकारणी, वसुली आणि नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा अधिक वेगाने होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागातील मालमत्ता कराशी संबंधित जुने रेकॉर्ड्स डिजिटल करण्यासाठी आणि मालमत्ता खात्यांची पुनर्रचना करण्यासाठी पालिका प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत मुंबईतील २४ प्रभाग (वॉर्ड) कार्यालये आणि ३ विभागीय कार्यालयांमध्ये मिळून एकूण ५४ डेटा एंट्री ऑपरेटरची २ महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे. या विशेष मोहिमेसाठी महापालिकेने अंदाजे ३० लाख ८० हजार १६० रुपये खर्च अपेक्षित धरला असून या कामासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या मोहिमेमुळे १ एप्रिल २०१० पासूनचे प्रलंबित आणि अपूर्ण रेकॉ आता पूर्णपणे अपडेट होणार आहेत.

कोस्टल रोडवर साकारणार जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र! रिलायन्सकडून ५१ हेक्टरचा कायापालट; पर्यटन, मनोरंजन केंद्रे उभारली जाणार

महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन खात्यामध्ये गेल्या १६ वर्षांतील अनेक जुने रेकॉ अद्याप संगणकावर अद्ययावत झालेले नसल्याने मालमत्तांच्या कर आकारणीची नोंदणी अपूर्ण किंवा जुन्या स्वरूपात आहे. आता प्रत्येक प्रभाग आणि विभागीय कार्यालयात प्रत्येकी दोन डेटा एंट्री ऑपरेटर नियुक्त केल्यामुळे हे सर्व कर रेकॉ अचूकपणे संगणकावर नोंदवून त्यांची पुनर्रचना करणे शक्य होणार आहे.

तांत्रिक पडताळणी पूर्ण

‘महाटेडर्स’ संकेतस्थळावरून राबवण्यात आलेल्या या त्रि-पाकीट प्रक्रियेअंतर्गत तांत्रिक पडताळणी पूर्ण झाली असून, पुढील प्रक्रिया भायखळा येथील उप कर निर्धारण आणि संकलन अधिकारी यांच्या कार्यालयातून राबवली जात आहे. आलेल्या निविदांबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार महापालिका प्रशासनाने आपल्याकडे राखून ठेवला आहे.

अचूक माहिती एका क्लिकवर होणार उपलब्ध

मालमत्ता कर हा मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा अत्यंत महत्त्वाचा स्रोत असल्याने जुने रेकॉर्ड डिजिटल आणि सुटसुटीत झाल्यावर कोणत्या मालमत्तेची किती कर थकबाकी आहे, याची अचूक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल, ज्यामुळे कर आकारणी आणि वसुलीच्या प्रक्रियेत कमालीची पारदर्शकता येईल, मानवी चुका टळतील आणि पालिकेच्या महसूल वाढीला गती मिळेल अशी अपेक्षा प्रशासनाच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.

अमित शाह यांचे मुंबईत आगमन; फडणवीसांकडून स्वागत, इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन

मोहिमेचा थेट फायदा होणार मुंबईकरांना

या डिजिटल मोहिमेचा थेट फायदा मुंबईकरांनाही होणार आहे. अनेकदा जुन्या नोंदींमधील त्रुटींमुळे नागरिकांना मालमत्ता कराची चुकीची बिले मिळतात, तसेच नावे बदलणे किंवा क्षेत्रफळ दुरुस्ती करणे यांसारख्या कार्मासाठी पालिकेच्या फेऱ्या माराव्या लागतात. मात्र आता हे सर्व उपलब्ध रेकॉ संगणकीकृत झाल्यामुळे भविष्यात नागरिकांच्या मालमत्ता कराशी संबंधित तक्रारी व अर्जाचा निपटारा प्रभागाच्या पातळीवर अत्यंत वेगाने आणि विनासायास करणे सोपे होणार आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai property tax records digitisation bmc appoints 54 data entry operators

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • muncipal corporation
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली
1

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वाहतूक-लॉजिस्टिक्ससाठी स्वतंत्र प्राधिकरण, १० वर्षांचा मास्टर प्लॅन होणार तयार
2

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वाहतूक-लॉजिस्टिक्ससाठी स्वतंत्र प्राधिकरण, १० वर्षांचा मास्टर प्लॅन होणार तयार

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
3

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात
4

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.