Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक पुन्हा सुरू; दरड हटवल्यानंतर वाहतुकीला हिरवा कंदील

लोणावळा-खोपोली परिसरात झालेल्या विक्रमी पावसानंतर बंद करण्यात आलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकबाबत मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. दरड हटविण्याचे काम आणि सुरक्षिततेची तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 07, 2026 | 09:48 AM
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक पुन्हा सुरू; दरड हटवल्यानंतर वाहतुकीला हिरवा कंदील

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक पुन्हा सुरू; दरड हटवल्यानंतर वाहतुकीला हिरवा कंदील

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसामुळे बंद करण्यात आलेली मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक अखेर सोमवारी रात्री पुन्हा वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.
  • दरड हटवून तांत्रिक तपासणीनंतर मार्ग सुरक्षित घोषित करण्यात आला असून सध्या दोन लेनवरून वाहतूक सुरू आहे.
  • खालापूर फूड मॉल परिसरातील साचलेले पाणी ओसरल्याने एक्स्प्रेसवेवरील वाहतूकही हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
खोपोली: लोणावळा-खोपोली परिसरातील मुसळधार पावसामुळे बंद करण्यात आलेली मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक अखेर सोमवारी रात्री उशिरा वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. दरड हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एमएसआरडीसी, सुरक्षा अभियंते आणि संबंधित बांधकाम कंपनीने घटनास्थळाची पाहणी करून मार्ग सुरक्षित असल्याचा अहवाल दिला. त्यानंतर रात्री १०.१० वाजल्यापासून पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

Raigad News: धाटाव MIDC मध्ये नालेसफाईचा फज्जा? केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर; नागरिकांची चिंता वाढली

मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याजवळ दरड कोसळली

रविवारी झालेल्या विक्रमी पावसाचा मोठा फटका द्रुतगती मार्गाला बसला होता. लोणावळा परिसरात अवघ्या २४ तासांत ६२५ मिमी, तर खोपोली परिसरात ३२३ मिमी पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याजवळ दरड कोसळली, तर खालापूर येथील फूड मॉल परिसरात पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने सकाळच्या सत्रात दोन्ही दिशेची वाहतूक विस्कळीत झाली होती.  (फोटो सौजन्य: Pinterest)

दरड हटविण्याचे काम पूर्ण

पहाटेच्या सुमारास बोगद्याबाहेरील कमानीलगत मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा ढिगारा कोसळल्याने प्रशासनाने तत्काळ संबंधित मार्गिका बंद केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर महामार्ग प्रशासनाने युद्धपातळीवर दरड हटविण्याचे काम सुरू केले. दिवसभर सुरू असलेली ही मोहीम संध्याकाळपर्यंत पूर्ण करण्यात आली.

केवळ दोनच लेन वाहतुकीसाठी खुल्या

तांत्रिक तपासणी आणि सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतर वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सध्या पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेतील केवळ दोनच लेन वाहतुकीसाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. डोंगरावरून अद्याप पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने उर्वरित दोन लेन तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. महामार्ग पोलिसांच्या माहितीनुसार, डोंगरावरील पाण्याचा वेग कमी झाल्यानंतर उर्वरित लेनही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. तसेच खालापूर येथील फूड मॉल परिसरात महामार्गावर साचलेले पाणीही पूर्णपणे ओसरल्याने वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत असून, दिवसभर अडकून पडलेल्या प्रवाशांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे.

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा हाहाकार! सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात; लोकल ट्रेनची वाहतूक उशिराने, रेड अलर्ट जारी

विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर टीका

सोमवारी मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या मोठ्या बोगद्या समोर मोठी दरड कोसळली. यानंतर तात्काळ मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद होताच, राजकारण तापले आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली. अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मिसिंग लिंकच्या बांधकामाबाबत प्रश्न उपस्थित केले.

Web Title: Mumbai pune expressway missing link reopens after landslide clearance traffic resumes on two lanes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • Marathi News
  • Mumbai Pune Missing Link
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Nilesh Naik: एडिटरच्या खुर्चीतून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यामागे; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून नवा प्रवास
1

Nilesh Naik: एडिटरच्या खुर्चीतून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यामागे; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून नवा प्रवास

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती
2

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती

Kolhapur FDA Rules: कोल्हापुरात महाप्रसाद, जेवणावळींसाठी आता FDAची परवानगी बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाई
3

Kolhapur FDA Rules: कोल्हापुरात महाप्रसाद, जेवणावळींसाठी आता FDAची परवानगी बंधनकारक; नियम मोडल्यास कारवाई

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत
4

‘मराठी येत नाही? मग घ्या नोटीस!’ पहिल्याच दिवशी १,२६८ टॅक्सी-रिक्षा चालकांवर कारवाई; शिकण्यासाठी महिनाभराची मुदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.