Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Rain News: मुंबईत पावसाची संततधार कायम, लोकलसेवा कोलमडली, प्रवाशांचा संताप!

Mumbai Local Update: मुंबईसह अनेक राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा पावसाने फार लवकर हजेरी लावली आहे. पाऊस सुरु होताच मुंबईच्या लोकल ट्रेनवर परिणाम झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 26, 2025 | 08:59 AM
Mumbai Rain News: मुंबईत पावसाची संततधार कायम, लोकलसेवा कोलमडली, प्रवाशांचा संताप!

Mumbai Rain News: मुंबईत पावसाची संततधार कायम, लोकलसेवा कोलमडली, प्रवाशांचा संताप!

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आणि शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, बारामती अशा अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. सततच्या सुरु असणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. याशिवाय वातावरणात देखील सतत बदल पाहायला मिळत आहे.

“ते तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात…; गिरीश महाजनांनी छगन भुजबळांवर लगावला जोरदार टोला

मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. ठाणे, घाटकोपर, कुर्ला, डोंबिवली, अशा अनेक भागांत रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरु आहे. वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे. पाऊस सुरु झाला आणि मुंबईच्या लोकल ट्रेनवर परिणाम झाला नाही, असं होणं कठीणच आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे आता मुंबईची लाईफलाईन असलेली लोकलसेवा कोलमडली आहे. मुंबई लोकल ट्रेन उशीराने धावत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

ठाणे ते कल्याण डाऊन आणि अप मार्गावरील लोकलसेवा 10 ते 15 मिनिटांनी उशीराने धावत आहेत. शिवाय कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील लोकलसेवा देखील उशीराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. धिम्या आणि जलद अशा दोन्ही मार्गावरील लोकलसेवा देखील उशीराने धावत आहेत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. शिवाय रस्त्यावर देखील काही ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक देखील उशीराने सुरु आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नरिमन पॉइंट अग्निशमन केंद्रात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. आय हॉस्पिटल (ग्रँट रोड), मेमनवाडा अग्निशमन केंद्र, सी वॉर्ड कार्यालय, कोलाबा अग्निशमन केंद्र, बी वॉर्ड कार्यालय, मांडवी अग्निशमन केंद्र, भायखळा अग्निशमन केंद्र, ब्रिटानिया स्टॉर्म वॉटर, नायर हॉस्पिटल, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर या भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे.

सततच्या सुरु असणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे. मुंबईसह नवी मुंबईत देखील पावसाची रिपरिप सुरु आहे. मध्य आणि पश्चिम मार्गवरील लोकलसेवेप्रमाणेच हार्बर मार्गावरील लोकलसेवा देखील 5 ते 10 मिनिटे उशीराने सुरु आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगाव , मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे या सर्व परिसरात सध्या मागील काही तासांपासून रिपरिप पाऊस सुरू आहे.

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर, बारामतीत पूरस्थिती, तीन इमारतींना तडे; अजित पवारांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

मुंबईत रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. जे.जे. उड्डाणपुलावर पाणी साचले असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुढील दोन तास मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. काही घरांमध्ये पाणी शिरले असून शासकीय रुग्णालयातही पाणी साचले आहे. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची देखील तारांबळ उडाली आहे.

Web Title: Mumbai rain news local train is running late passengers suffering

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 08:59 AM

Topics:  

  • Mumbai local train
  • Mumbai News
  • Rain News

संबंधित बातम्या

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
1

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

India Rain Alert: आता नुसता पाऊस नव्हे तर…; ‘या’ राज्यांवरचे संकट वाढले, IMD चा अलर्टने चिंता वाढली
2

India Rain Alert: आता नुसता पाऊस नव्हे तर…; ‘या’ राज्यांवरचे संकट वाढले, IMD चा अलर्टने चिंता वाढली

Mumbai Local News : धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती
3

Mumbai Local News : धावत्या लोकलमध्ये मोटारमनची तब्येत बिघडली अन्… ;काळ आला पण वेळ आली नव्हती

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.