महाराष्ट्रात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातही रविवारी जोरदार पावसानं थैमान घातलं. पुणे शहरासह बारामती, दौंड परिसरात अतिमुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः बारामतीत पावसाचं मोठं नुकसान झालं आहे.
Bullet Train : बुलेट ट्रेनचे पहिले स्टेशन तयार; २०२९ पासून सेवा उपलब्ध
बारामती शहरातील नीरा डावा कालवा फुटल्यामुळे पाणी प्रचंड वेगाने पालखी महामार्गावर आले आणि काटेवाडी-भवानीनगर रस्ता बंद करण्यात आला. या भागातील दीडशेहून अधिक घरांमध्ये पाणी शिरलं असून, अनेक कुटुंबांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवारी) भल्या पहाटे बारामतीत भेट देऊन पूरग्रस्त भागांची पाहणी केली.
तडे गेलेल्या तीन इमारतींची पाहणी
बारामती एमआयडीसी परिसरात पावसामुळे पेन्सिल चौकाजवळ खुदाई सुरू असलेल्या कामांमुळे शेजारच्या तीन इमारतींना तडे गेले आहेत. ‘साईरंग’, ‘ऋषिकेश’ आणि ‘श्री समर्थ’ या तीन इमारतींमध्ये मोठं नुकसान झालं आहे. या इमारतींमध्ये राहणाऱ्या सर्व कुटुंबांना तात्काळ स्थलांतरित करण्यात आलं असून, सध्या सर्व फ्लॅट्स रिकामे करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः या परिसराची पाहणी करत आहे. भल्या पहाटे ते बारामतीत दाखल होऊन नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहे.
पावसाची आकडेवारी (25 मे, रात्री 9:30 पर्यंत):
दौंड: 98.0 मिमी
लोणावळा: 76.0 मिमी
बारामती: 49.5 मिमी
धामधरे: 35.5 मिमी
वडगावशेरी: 34.0 मिमी
हडपसर: 25.0 मिमी
नारायणगाव: 17.0 मिमी
NDA: 3.5 मिमी
पुरंदर: 0.5 मिमी
पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प
दौंड तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली भागात पाणी साचलं आहे. या दरम्यान एका इनोवा गाडीला पुराच्या पाण्याचा फटका बसला आणि ती वाहून गेली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
Vehicle Sales : वाहनविक्रीत महाराष्ट्र अव्वल; एका वर्षात पाच लाखांहून अधिक विक्री