Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Rain: मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपली! अंधेरी, सांताक्रुझमध्ये पावसाची दमदार सुरुवात…

Mumbai Rain Updates: मुंबईतील अनेक भागांमध्ये अखेर आता पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईकरांना दिलासा मिळाला असून अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईसह ठाण्यातील काही भागांमध्ये देखील पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 03, 2026 | 08:11 AM
Mumbai Rain: मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपली! अंधेरी, सांताकृझमध्ये पावसाची दमदार सुरुवात...

Mumbai Rain: मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपली! अंधेरी, सांताकृझमध्ये पावसाची दमदार सुरुवात...

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील अंधेरी, बांद्रा, सांताकृझ, खार आणि जोगेश्वरी परिसरात पहाटेपासून जोरदार पावसाची सुरुवात झाली.
  • ठाण्यासह काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या सरींची नोंद झाली.
  • उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे त्रस्त मुंबईकरांना अखेर पावसामुळे मोठा दिलासा मिळाला.
Mumbai Rain News: मुंबईकरांना आता अखेर उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. कारण आज 3 जून रोजी पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अंधेरी, बांद्रा, सांताक्रुझ, खार या भागांमध्ये आज पहाटेपासूनच जोरदार पाऊस कोसळत असल्याचे पाहायला मिळत आहे. जून महिना सुरु झाला तरी देखील पाऊस न आल्याने मुंबईकरांची चिंता काही प्रमाणात वाढली होती. याशिवाय मुंबईकर वाढत्या उष्णता आणि उकाड्यामुळे देखील हैराण झाले होते.

NEET आणि CBSE परीक्षांमधील पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा “युवा आक्रोश मोर्चा”

मुंबईकरांना मे महिन्याच्या अखेरपासूनच पावसाची प्रतिक्षा होती. त्यांची ही प्रतिक्षा अखेर आता संपली आहे. कारण आता मुंबईतील अंधेरी, बांद्रा, सांताक्रुझ, खार या भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु

अंधेरी, बांद्रा, सांताक्रुझ, खार या भागांसह जोगेश्वरी आणि ठाण्यातील काही भागांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. तर काही भागांमध्ये केवळ पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत तर काही भागांत केवळ वादळी वारे सुटले आहेत. एकूणच आता मुंबईतील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाचे जोरदार आगमन झाले आहे.

पावसाची प्रतिक्षा अखेर संपली

गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यासह अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. त्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले होते. नागरिकांना आतुरतेने पावसाची प्रतिक्षा लागली होती. आता अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. खरं तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळत होत्या. पण जोरदार पाऊस कधी सुरु होणार आणि उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार याची मुंबईकरांना प्रतिक्षा होती. आता अखेर त्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. मुंबई उपनगरांसह ठाणे आणि नवी मुंबईतील काही भागांमध्ये देखील पावसाने हजेरी लावली आहे. सध्या अंधेरी, बांद्रा, सांताक्रुझ, खार, जोगेश्वरी, ठाणे, वसई, कल्याण आणि पनवेलमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे.

मुंबईचे प्रवेशद्वार हिरवळीने फुलणार! वाशी, ऐरोली नाक्यावर होणार हरित विकास; महापौर रितू तावडेंकडून स्थळपाहणी

वाहतुकीचा वेग मंदावला

मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईतील पावसाचा वेग पाहता, सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. तसेच अचानक पाऊस सुरु झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सकाळच्या वेळेस नागरिकांची कामावर जाण्याची घाई असते आणि अशातच मुसळधार पाऊस सुरु झाल्याने रस्त्यावरील वाहतुकीचा वेग काहीसा मंदावला आहे.

Web Title: Mumbai rain update heavy rainfall in andheri santacruz bandra khar western line today at 3 june 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 07:47 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Mumbai Rain
  • Rain Update

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: पावसाचा जोर 98 टक्के मात्र पिकांना धोका? तज्ञांचा शेतकऱ्यांना ‘हा’ मोलाचा सल्ला
1

Maharashtra Rain Alert: पावसाचा जोर 98 टक्के मात्र पिकांना धोका? तज्ञांचा शेतकऱ्यांना ‘हा’ मोलाचा सल्ला

Maharashtra Rain Alert: दोन दिवस छत्री घेऊनच फिरा; वादळी वारे अन्…; IMD ने दिला ‘हा’ इशारा
2

Maharashtra Rain Alert: दोन दिवस छत्री घेऊनच फिरा; वादळी वारे अन्…; IMD ने दिला ‘हा’ इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.