Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई पुन्हा दहशवाद्यांच्या निशाण्यावर? ताज आणि ट्रायडेंट हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस हाय अलर्टवर

Mumbai Bomb Threat: एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील दोन अत्यंत प्रतिष्ठित आणि आलिशान हॉटेल्सना 'ताज हॉटेल' आणि 'ट्रायडंट हॉटेल'ला फोन करून ती उडवून देण्याची धमकी दिली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 06, 2026 | 07:08 PM
मुंबई पुन्हा दहशवाद्यांच्या निशाण्यावर? (Photo Credit- X)

मुंबई पुन्हा दहशवाद्यांच्या निशाण्यावर? (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मुंबई पुन्हा दहशवाद्यांच्या निशाण्यावर?
  • ताज आणि ट्रायडेंट हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी
  • पोलीस हाय अलर्टवर!
Mumbai Bomb Threat News: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचे सावट निर्माण झाले आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील दोन अत्यंत प्रतिष्ठित आणि आलिशान हॉटेल्सना ‘ताज हॉटेल’ आणि ‘ट्रायडंट हॉटेल’ला फोन करून ती उडवून देण्याची धमकी दिली आहे. या धमकीच्या फोननंतर, संपूर्ण मुंबई पोलीस दल आणि सुरक्षा यंत्रणांना ‘हाय अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही तीच हॉटेल्स आहेत जी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी लक्ष्य करण्यात आली होती; ज्या घटनेमुळे यापूर्वी सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

धमकीचा फोन आणि पोलिसांची तत्पर कारवाई

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला, ज्यामध्ये फोन करणाऱ्या व्यक्तीने ‘ताज’ आणि ‘ट्रायडंट’ या दोन्ही हॉटेल्सवर लवकरच दहशतवादी हल्ला होणार असल्याचा दावा केला. ही माहिती मिळताच, मुंबई पोलिसांनी कोणताही विलंब न करता दोन्ही हॉटेल्सभोवतीचा सुरक्षा घेरा (कॉर्डन) अधिक मजबूत केला आणि तो अभेद्य बनवला. घटनास्थळी त्वरित श्वान पथके, बॉम्ब शोधक आणि नाशक पथके (BDDS) आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. हॉटेल्सच्या आजूबाजूचा परिसर सील करण्यात आला आणि तिथे कसून शोधमोहीम राबवण्यात आली.

A threatening call was received at the Taj Hotel and Trident Hotel, with the caller claiming that a terrorist attack was imminent at both locations. Following the threat, Mumbai Police were informed and security was immediately heightened. The police traced the caller and… pic.twitter.com/zUEJwXeYDB — IANS (@ians_india) May 6, 2026

Mumbai News: हा तर साउथ हिरोपेक्षा खतरनाक निघाला! डोक्यात कोयता खुपसलेला असतानाही तरुणाचा रुग्णालयापर्यंत प्रवास; पाहा VIDEO

लोकेशन ट्रेसिंग आणि सायनमध्ये अटक

धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिसांच्या तांत्रिक पथकाने त्वरित फोन करणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक ‘ट्रेस’ करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान, फोन करणाऱ्या व्यक्तीचे ठिकाण मुंबईतील ‘सायन’ परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्परतेने हालचाल करत सापळा रचला आणि संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेऊन, पुढील चौकशीसाठी एका गुप्त ठिकाणी हलवले आहे.

चौकशी आणि सुरक्षा यंत्रणांची सतर्कता

सध्या मुंबई पोलीस आणि इतर गुप्तचर यंत्रणा ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची कसून चौकशी करत आहेत. या धमकीमागे खरोखरच एखादा मोठा दहशतवादी कट रचला गेला होता, की ही केवळ कोणीतरी केलेली खोडसाळपणाची कृती होती, हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याचा कोणत्याही संशयास्पद संघटनांशी काही संबंध आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील इतर महत्त्वाची ठिकाणे आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे, परंतु सतर्क राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास त्वरित प्रशासनाला कळवण्याचे आवाहन केले आहे.

Mumbai Crime : NCB ची मोठी कारवाई; 349 किलो कोकेन जप्त, 1745 कोटींचा ड्रग रॅकेट उघड; अमित शहांनी दिली माहिती

Web Title: Mumbai taj trident hotel bomb threat high alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Bomb threat
  • Mumbai
  • Mumbai Police
  • Taj Hotel
  • Trident Hotel

संबंधित बातम्या

Mumbai News: डीआरपीसाठी धारावीतील नगरसेवक मैदानात; ‘प्रलंबित’ पात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी विशेष शिबिरे
1

Mumbai News: डीआरपीसाठी धारावीतील नगरसेवक मैदानात; ‘प्रलंबित’ पात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी विशेष शिबिरे

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्रवेशाची संधी; संशोधनपूरक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची
2

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्रवेशाची संधी; संशोधनपूरक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची

Mumbai News : ‘सेंट’चे मुंबईत नवे हेल्थकेअर सेंटर; आजारांचे लवकर निदान करण्यावर भर
3

Mumbai News : ‘सेंट’चे मुंबईत नवे हेल्थकेअर सेंटर; आजारांचे लवकर निदान करण्यावर भर

Weather Alert : अरे देवा! एकीकडे पारा 40 वर, तर दुसरीकडे वादळी पावसाचं संकट, 15 जिल्ह्यांना अलर्ट
4

Weather Alert : अरे देवा! एकीकडे पारा 40 वर, तर दुसरीकडे वादळी पावसाचं संकट, 15 जिल्ह्यांना अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.