Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Rain Update : मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाचा कहर; कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवलीत साचले पाणी; लोकल सेवाही विस्कळीत

Mumbai Local Train Updates: मुंबई आणि ठाण्यात सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी आणि बोरिवलीसह अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. रस्त्यांवर जलसाचल्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, अनेक ठिकाणी मुंबईकरांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 01, 2026 | 01:03 PM
मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाचा कहर; कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवलीत साचले पाणी; लोकल सेवाही विस्कळीत

मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाचा कहर; कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी, बोरिवलीत साचले पाणी; लोकल सेवाही विस्कळीत

Follow Us
Follow Us:
  • पावसाने मुंबईची पुन्हा दाणादाण
  • मुंबईच्या कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी बोरिवली भागात जोरदार पाऊस
  • अनेक ठिकाणी पाणी साचल्याने पादचारी, वाहनांची गैरसोय
Mumbai Rain Update News Marathi : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 30 जूनपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूझ आणि वांद्रे या पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसानंतर सकाळीही पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. अंधेरी सबवेमध्ये चार ते पाच फूट पाणी साचल्याने तेथून वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दरम्यान, ठाण्यात मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून आतापर्यंत १३७.१२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

महापालिकेचा कर्मचारी गटारात पडला, पण चौकशी त्याचीच? महापौर रितू तावडेंच्या आदेशावर वर्षा गायकवाडांचा संताप

लोकल रेल्वे सेवा उशिराने

मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांना बसला आहे. मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. हार्बर मार्गावरील लोकल सेवाही १५ ते २० मिनिटे विलंबाने सुरू आहेत, तर पश्चिम रेल्वेवरील गाड्या ५ ते १० मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती मिळाली आहे.

पुढील चार दिवस ‘ऑरेंज अलर्ट’

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. २ आणि ३ जुलै रोजी या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जोरदार पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई आणि कोकण परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहू शकतो. अरबी समुद्रातून येणाऱ्या मजबूत पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अंधेरीतील डी.एन. नगर मेट्रो स्थानकाजवळ एक मोठे झाड मुख्य रस्त्यावर कोसळल्याने मार्ग बंद झाला. तसेच स्वामी विवेकानंद (एस.व्ही.) रोडवरही झाड पडल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. अग्निशमन दल आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून झाडे हटवण्याचे काम सुरू आहे.

मुंबईत किती पावसाची नोंद?

मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ८ ते बुधवारी सकाळी ८ या २४ तासांत पूर्व उपनगरांत सरासरी १०९ मिमी, पश्चिम उपनगरांत ८७ मिमी, तर मुंबई शहर भागात ८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम उपनगरातील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथे १३२.४ मिमी, तर बोरिवली येथे १२६ मिमी पाऊस झाला. दिंडोशी अग्निशमन केंद्रात १२३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

भरती-ओहोटीची वेळ
भरती (High Tide): दुपारी १:१० वाजता – ४.२२ मीटर

ओहोटी (Low Tide): सायंकाळी ७:१६ वाजता – १.९१ मीटर

हवामान विभागाने पुढील काही तास मुंबई, ठाणे आणि परिसरात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, जलसाचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Mumbai Rain Updates: मुंबईत रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग! सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात; ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प

Web Title: Mumbai thane heavy rain waterlogging kurla andheri jogeshwari borivali news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • imd
  • Monsoon
  • Mumbai Rain

संबंधित बातम्या

Mumbai Water Crisis : मुंबईच्या पाणीसाठ्यावर संकट! सात धरणांत फक्त 7% पाणी, जुलैच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष
1

Mumbai Water Crisis : मुंबईच्या पाणीसाठ्यावर संकट! सात धरणांत फक्त 7% पाणी, जुलैच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष

Maharashtra Weather: वेळीच सावध व्हा! महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, कुठे किती बरसणार?
2

Maharashtra Weather: वेळीच सावध व्हा! महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, कुठे किती बरसणार?

Kids Health in Monsoon: पावसाळ्यात मुलांच्या आहाराची घ्या विशेष काळजी; चुकूनही देऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा आरोग्य बिघडू शकते
3

Kids Health in Monsoon: पावसाळ्यात मुलांच्या आहाराची घ्या विशेष काळजी; चुकूनही देऊ नका ‘हे’ पदार्थ; अन्यथा आरोग्य बिघडू शकते

Monsoon Health News : पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढला! उल्हासनगरच्या रुग्णालयात एका दिवसात आठ जण दाखल
4

Monsoon Health News : पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढला! उल्हासनगरच्या रुग्णालयात एका दिवसात आठ जण दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.