Mumbai Rain Updates: मुंबईत रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग! सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात; ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प
Maharashtra Rain Alert: दारं, खिडक्या बंद करा! पुढील 6 दिवस धोक्याचे; कोकण अन् गोव्यात…
सकाळी कामावर जाण्याची घाई असते आणि अशाच वेळी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी वाहतूक देखील उशिराने सुरू आहे. ठाण्यावरून वाशी आणि पनवेलच्या दिशेने जाणारी अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने प्रवासी वैतागले आहेत. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहेत. तसेच वाहतूक पुन्हा सुरू होईपर्यंत ट्रान्सहार्बर मार्गावरील प्रवाशांना कुर्ला मार्गे हार्बर मार्गावरवरून प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांना पावसाची प्रतिक्षा होती. उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर पावसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता पहिल्याच पावसात मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. तसेच रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्याच पावसात मुंबईकरांना रेल्वे आणि रस्ते वाहतुकीने प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच नालासोपाऱ्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. जोरदार पावसामुळे नालासोपाऱ्यातील अनेक भागांतील रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. स्थानिक प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी केलेल्या नालेसफाईच्या आणि रस्ते विकासकामांच्या दाव्यांची पहिल्याच पावसात पोलखोल झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक ग्राउंड फ्लोअर मधील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
साताऱ्यात पावसाची चाहूल, कोयना परिसरात वाढली पर्जन्यवृष्टी, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
मान्सूनच्या पहिल्याच जोरदार पावसाने मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या पावसाळापूर्व तयारीची पोलखोल झाली आहे. भाईंदर पश्चिमेतील अनेक परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी रस्ते जलमय झाले, तर अनेक घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले. यामध्ये माजी नगरसेवक ओमप्रकाश अग्रवाल यांच्या निवासस्थानीदेखील गुडघाभर पाणी शिरल्याची घटना घडली. घरातील फर्निचर, कागदपत्रे आणि इतर साहित्य पाण्यात भिजल्याने नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर माजी नगरसेवक ओमप्रकाश अग्रवाल यांनी महानगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.






