Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदींच्या २५ वर्षांच्या प्रवासाची रंगमंचावर गाथा; ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल; रविंद्र चव्हाणांचा मोठा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या प्रवासावर आधारित ‘नमो सेवा – अनसुनी कहानियाँ’ पथनाट्याचा महाराष्ट्रात शुभारंभ झाला. ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

  • By विवेक
Updated On: Oct 04, 2026 | 09:13 PM
ravindra chavhan namo seva

ravindra chavhan namo seva

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील केसी महाविद्यालयात ‘नमो सेवा – अनसुनी कहानियाँ’चा शुभारंभ
  • १५ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात मोठा प्रयोग; विधानसभा क्षेत्रात १० प्रयोग
  • ‘हनुमान अंश’प्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ही रेकॉर्ड करेल; रविंद्र चव्हाणांचा विश्वास
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासातील सेवाभाव, समर्पण, राष्ट्रभक्ती आणि सुशासनाची प्रेरणादायी गाथा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

या अभियानाअंतर्गत ‘नमो सेवा – अनसुनी कहानियाँ’ या पथनाट्य उपक्रमाचा महाराष्ट्रातील शुभारंभ मुंबईतील केसी महाविद्यालय येथे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी पथनाट्य सादर करणाऱ्या कलाकारांचा आणि संयोजकांचा सत्कार करण्यात आला.

पंतप्रधान मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील संघर्ष, सेवाभाव, राष्ट्रनिष्ठा आणि जनसेवेचा प्रवास पथनाट्याच्या माध्यमातून प्रभावी पद्धतीने जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. पिंपरी-चिंचवडमधील कलाकार पथनाट्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग महाराष्ट्राच्या विविध भागांत सादर करणार आहेत. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात एक मोठा प्रयोग, तर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात किमान १० पथनाट्य प्रयोग आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणावर हे पथनाट्य सादर होणार असून, नवोदित कलाकारांना या माध्यमातून जनजागृती आणि सामाजिक संदेश देण्याची संधी मिळणार आहे.

Ramesh Mhatre Doctor Assault : डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेच्या अडचणी वाढल्या; आधारवाडी कारागृहात रवानगी

“आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या चरित्रातून आपल्याला सेवाभाव, सुशासन, समर्पण आणि राष्ट्रभक्तीची शिकवण मिळते. त्यांच्या जीवनातील असे प्रेरणादायी क्षण पथनाट्याच्या माध्यमातून जनमानसात रुजविण्यासाठी ‘नमो सेवा गाथा’ हा स्तुत्य उपक्रम आहे. ‘हनुमान अंश’ या नवोदित कलाकारांच्या चित्रपटाने ज्याप्रमाणे रेकॉर्ड निर्माण केले, त्याचप्रमाणे ‘नमो सेवा गाथा’ हे पथनाट्य देखील रेकॉर्ड करेल” असा विश्वास यावेळी रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

या शुभारंभ सोहळ्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष आ. राहुल नार्वेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, आ. अमित गोरखे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Satara: जिल्हा बँक निवडणुकीची आज छाननी, उमेदवार किंवा अधिकृत सूचकांनाच प्रवेश; हरकतींसाठी पुरावे अनिवार्य

Web Title: Namo seva gatha ravindra chavan street play maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 09:13 PM

Topics:  

  • BJP
  • Mumbai News
  • PM Narendra Modi
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन
1

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार
2

Congress on Caste Census : जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा तापला, ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसचा भाजपाविरोधात एल्गार

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल
3

Ravindra Chavan on SIR : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चानंतर आता भाजपचा पलटवार; रविंद्र चव्हाणांनी उपस्थित केले 3 मोठे सवाल

BJP Rajyasabha Candidate List : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; अभिनेत्रीला पुन्हा उतरवलं निवडणुकीच्या मैदानात!
4

BJP Rajyasabha Candidate List : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; अभिनेत्रीला पुन्हा उतरवलं निवडणुकीच्या मैदानात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.