• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune District Collector Statement About Bhima Koregaon Vijaystmabh Divas

“सर्व अनुयायांना कोणत्याही प्रकारचा…”; विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याबाबत काय म्हणाले जिल्हाधिकारी डुडी?

कोरेगाव भिमा येथून वढू बुद्रुक येथे जाणाऱ्या अनुयायांकरीता इनामदार पार्किंग, कोरेगाव भिमा येथून पीएमपीएमएलची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलीस दलाच्यावतीने वाहतूक वळविण्याबाबत आदेश पारित केले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 31, 2025 | 04:51 PM
“सर्व अनुयायांना कोणत्याही प्रकारचा…”; विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याबाबत काय म्हणाले जिल्हाधिकारी डुडी?

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज (फोटो -सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे प्रशासनाकडून सुसज्ज नियोजन
आवश्यक सर्व सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध
अनुयायांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाणार

शिक्रापूर: कोरेगाव भीमा ता. शिरुरसह (Pune News)पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी आवश्यक सर्व सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्याची पूर्वतयारी करण्यात आली असून सोहळ्याच्या नियोजनासाठी प्रशासन सज्ज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

कोरेगाव भीमा ता. शिरुर सह पेरणे फाटा येथील कार्यक्रम बाबत बोलताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले कि दरवर्षी साजरा होणारा विजयस्तंभ अभिवादन सोहळा हा महत्वाचा कार्यक्रम असून यावर्षी अधिक अनुयायी येण्याचे गृहीत धरून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सर्व अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहे. नियोजन करताना विविध संघटना आणि नागरिकांच्या सूचनाही लक्षात घेण्या आल्या आहेत. सोहळा शांतता, संयम आणि त्याच उंचीने साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. तर सुरक्षेच्या व निगराणीच्या दृष्टीने पोलिस विभागामार्फत सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे तसेच ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा करण्यात आली असून वाहनतळाचे ठिकाण, पिकअप व ड्रॉपचे ठिकाण, वॉच टॉवर्स, पोलीस मदत केंद्र, वज्र मोबाईल आदी व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके आदी यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अहिल्यानगरमार्गे येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांकरिता वक्फ बोर्ड तसेच मुंबई नाशिक रोडकडून येणाऱ्या अनुयायांकरीता टोरंटो गॅस वाहनतळ आणि जातेगाव खुर्द चाकणरोड येथे, तर पोलीस व प्रशासन यांच्या वाहनांकरीता तोरणा वाहनतळ येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

Pune Traffic: आज संध्याकाळपासून ‘हा’ मार्ग राहणार बंद; कारण काय? वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणार

कोरेगाव भिमा येथून वढू बुद्रुक येथे जाणाऱ्या अनुयायांकरीता इनामदार पार्किंग, कोरेगाव भिमा येथून पीएमपीएमएलची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलीस दलाच्यावतीने वाहतूक वळविण्याबाबत आदेश पारित केले आहेत. प्रशासनाने वतीने पीएमपीएलच्यावतीने ३१ डिसेंबर २०२५ रोजी ३७५, तर १ जानेवारी २०२६ रोजी १ हजार २६० पीएमपीएल बसेसचे नियोजन केले आहे. प्रत्येक बसवर दोन कर्मचारी, राखीव चालक, तांत्रिक कर्मचारी मिळून अशी ४ हजार २०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असताना बार्टीच्या वतीने एकूण ३१० बुक स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने विजयस्तंभाला फुलांची सजावट, विद्युत रोषणाई, परिसर डागडुजी, पत्रकार कक्ष, मंडप, परिसर सुशोभिकरण आदी व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग, महावितरणने परिसरात विद्युत पुरवठा करण्यात आला आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने २३ आरोग्य केंद्र, ४३ रुग्णवाहिका, १८ खासगी रुग्णालयातील २८६ खाटा आरक्षित, १५५ प्रशिक्षित मनुष्यबळ, उपहारगृह व टँकरकरिता ३३ तपासणी पथके, ८० घंटागाडी, शुद्ध पाण्याची व्यवस्थेसाठी १५० टँकर्स, पाणी भरण्याच्या ठिकाणी २०० कर्मचारी नियुक्त, २ हजार ८०० शौचालय, २६५ सफाई कामगार, २६० पर्यवेक्षण अधिकारी व कर्मचारी, ९ हिरकणी कक्ष आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. पेरणे, कोरेगाव भिमा ते पिंपळे जगताप रस्ता, ढरंगेवस्ती, कोरेगाव भिमा ते वाडेवस्ती आदी ठिकाणी रस्ते दुरुस्ती, पिण्याच्या पाणी भरण्याचे ठिकाणी मुरुम भरण्यासह शोषखड्डा करण्यात आले आहेत.

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १ महानिरीक्षक, ३ पोलीस उपमहानिरीक्षक, २० पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, ८ राज्य राखीव पोलीस दल तुकड्या, ३ शिघ्र प्रतिसाद दल, १४ घातपात विरोधी पथक, १८ बीडीडीएस पथके, ६५० होमगार्ड, ४ हजार ७०० पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण सोहळ्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता फेस रिकगनायजेशनकरिता २५१ ठिकाणी अत्याधुनिक सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. १९ ठिकाणी वाहनतळाच्या माध्यमातून २० हजार चारचाकी वाहनाची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने ४ पोलीस उपायुक्त, ८ सहायक पोलीस उपायुक्त, ४५ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक एकूण १७१, १ हजार ३२५ अंमलदार, वार्डन व होमगार्ड एकूण ६५०, २ सर्व्हेलन्स व्हॅन, ३ आरसीपी आणि १ शिघ्र प्रतिसाद दलातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण कार्यालयाच्यावीने कायदा व सुवव्यस्थेच्यादृष्टीने शिरुर तालुक्यातील वढू बुद्रुक येथील छत्रपती शंभाजी महाराज व गोविंद गोपाळ महाराज यांच्या समाधीस्थळी अनुयायी दर्शनासाठी येतात. यादृष्टीने गर्दीवर नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता कोरेगाव भिमा, वढु बुद्रुक व शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बंदोबस्ताकरिता ३३ वरिष्ठ पोलिस अधिकारी, ३३२ इतर पोलिस अधिकारी, ३ हजार १० पोलिस अंमलदार, १ हजार ५०० होमगार्ड, ४ राज्य राखीव पोलीस दल तुकड्या, १० स्ट्रायकींग फोर्स, ४ आरसीपी पथक, २ शिघ्र प्रतिसाद दल आणि ७ बीडीडीएस पथके नेमण्यात आली आहेत.

Web Title: Pune district collector statement about bhima koregaon vijaystmabh divas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 04:51 PM

Topics:  

  • Koregaon Bhima
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: भाजप निष्ठावंतांना विसरला? महापालिका निवडणुकीआधी कार्यकर्ते नाराज
1

Maharashtra Politics: भाजप निष्ठावंतांना विसरला? महापालिका निवडणुकीआधी कार्यकर्ते नाराज

इच्छुकांच्या बोटात खड्यांच्या अंगठ्या, मनगटावर गंडेदोरे; पुणे महापालिका निवडणुकीत बुवा–बाबांचे ‘अदृश्य प्रचारयंत्र’
2

इच्छुकांच्या बोटात खड्यांच्या अंगठ्या, मनगटावर गंडेदोरे; पुणे महापालिका निवडणुकीत बुवा–बाबांचे ‘अदृश्य प्रचारयंत्र’

Political News : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली; महापालिका अधिकारी सज्ज, खर्चावर राहणार करडी नजर
3

Political News : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली; महापालिका अधिकारी सज्ज, खर्चावर राहणार करडी नजर

Pune Traffic: आज संध्याकाळपासून ‘हा’ मार्ग राहणार बंद; कारण काय? वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणार
4

Pune Traffic: आज संध्याकाळपासून ‘हा’ मार्ग राहणार बंद; कारण काय? वाहतूक पर्यायी मार्गाने वळविणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: संजय राऊतांच्या जिवाला धोका? बॉम्ब शोध पथक घरी दाखल

Maharashtra Politics: संजय राऊतांच्या जिवाला धोका? बॉम्ब शोध पथक घरी दाखल

Dec 31, 2025 | 06:29 PM
Baba Vanga predictions 2026: २०२६ मध्ये मोठे आर्थिक संकट? बाबा वांगांच्या भविष्यवाण्यांनी जगभरात माजली खळबळ

Baba Vanga predictions 2026: २०२६ मध्ये मोठे आर्थिक संकट? बाबा वांगांच्या भविष्यवाण्यांनी जगभरात माजली खळबळ

Dec 31, 2025 | 06:24 PM
‘औंदा ह्यो पाऊस…’, शेतकऱ्यांच्या वेदनांचा कडवा हुंकार; कवी बाबा पवारांचा सडेतोड प्रहार

‘औंदा ह्यो पाऊस…’, शेतकऱ्यांच्या वेदनांचा कडवा हुंकार; कवी बाबा पवारांचा सडेतोड प्रहार

Dec 31, 2025 | 06:07 PM
Maharashtra Politics : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश

Maharashtra Politics : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश

Dec 31, 2025 | 05:58 PM
IND W vs SL W : दीप्ती शर्माने गाजवले 2025 हे वर्ष! ‘या’ विक्रमासह प्रस्थापित केला खास दबदबा 

IND W vs SL W : दीप्ती शर्माने गाजवले 2025 हे वर्ष! ‘या’ विक्रमासह प्रस्थापित केला खास दबदबा 

Dec 31, 2025 | 05:45 PM
Maharashtra Politics : अखेर परभणीतही भाजपा-सेना युती तुटली; भाजपने युती तोडल्याचा जोरदार आरोप

Maharashtra Politics : अखेर परभणीतही भाजपा-सेना युती तुटली; भाजपने युती तोडल्याचा जोरदार आरोप

Dec 31, 2025 | 05:45 PM
महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद

महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट! नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाला मंजुरी; प्रवास १७ तासांनी होणार जलद

Dec 31, 2025 | 05:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Dec 31, 2025 | 03:52 PM
Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Dec 31, 2025 | 02:26 PM
Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Dec 31, 2025 | 02:22 PM
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.