Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबई पालिकेचा मोठा निर्णय! मार्केटमधील ३०% जागा महिला बचतगटांसाठी राखीव

नवी मुंबई महापालिकेने महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत महिलांसाठी विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. ऑगस्टपासून या योजनांची अंमलबजावणी सुरू होणार असून महिला बचतगटांना मोठा लाभ मिळणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 22, 2026 | 12:16 PM
नवी मुंबई पालिकेचा मोठा निर्णय! मार्केटमधील ३०% जागा महिला बचतगटांसाठी राखीव

नवी मुंबई पालिकेचा मोठा निर्णय! मार्केटमधील ३०% जागा महिला बचतगटांसाठी राखीव

Follow Us
Follow Us:
  • पालिकेच्या मार्केटमधील ३०% जागा महिला बचतगटांसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय.
  • महिलांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि आर्थिक सहाय्य देण्यासाठी विविध योजना.
  • विधवा, घटस्फोटित आणि एकल महिलांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी नवीन लाभदायी योजना ऑगस्टपासून लागू.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांनी आता पालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून विविध योजनांची सुवर्णसंधी मिळणार आहे. महिलांच्या विविध योजना राबविण्याकरिता पालिका आयुक्तांचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत चर्चेकरिता पटलावर आणण्यात आला होता. पालिकेने बांधलेल्या मार्केटमध्ये ३० टक्के जागा महिला बचत गटांसाठी आरक्षित ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, शहरात उभारण्यात येणारे क्रीडा सेंटर, एमआयडीसी क्षेत्रातील हॉस्पिटल व वाणिज्य संकुले येथे लागणाऱ्या मनुष्यबळाला महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी देण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली. सदस्यांनी केलेल्या सूचनेसह मागण्याची पूर्तता करून महिलांच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; 15 ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन

प्रस्तावावर सदस्यांनी मांडली मते

महिला सक्षमीकरण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या समाजविकास विभागाने नव्या कल्याणकारी योजनांचा प्रस्ताव तयार केला असून २१ जुलै रोजी महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. महिला बचत गटांना व्यवसायासाठी आर्थिक मदत, ज्येष्ठ व एकल महिलांसाठी निर्वाहभत्ता, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, महिलांसाठी रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण या योजनांवर उपमहापौर दशरथ भगत, नगरसेविका अॅड. अपर्णा गवते, नगरसेविका नेत्रा शिर्के, नगरसेविका माधुरी सुतार, शिवसेना गट नेते मनोज हळदणकर, नगरसेवक जगदीश गवते आदी सदस्यांनी मते मांडली.

Mumbai News: उड्डाणपुलांमधील चुका पालिकेला भोवल्या! मुंबईतील प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी २९ तज्ज्ञ कंपन्यांची नियुक्ती

वयोमर्यादेत वाढ; ६० वर्षांऐवजी ७५ वर्षे

आयुक्त डॉ. शिंदे यांनी ६० वर्षांवरील विधवा, घटस्फोटित आणि एकल महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्यात येणार असून ६० वर्षाची वयोमर्यादा आता ७५ वर्षे करण्यात आली असून देण्यात येणाऱ्या अनुदानातदेखील वाढ करून २० हजार करण्यावर मांडलेल्या सूचना, खाजगी शाळेप्रमाणे विद्यार्थ्यांना ओळखपत्र देणे, तृतीयपंथींना टेलरिंग प्रशिक्षण उत्पादन साधने देणे, देहविक्री करणाऱ्या महिलांना स्वावलंबी करणे, परिवहन सेवेत ४०० महिलांना प्रशिक्षण देण्याचा तसेच विद्याथ्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून करून देणे या सदस्यांच्या सूचना लक्षात घेऊन ऑगस्टपासून अमलबजावणी करणार असल्याचे आयुक्तांनी सभागृहाला सांगितले. यावेळी महासभेत बोलताना शिवसेना नगरसेविका सरोज पाटील यांनी ‘विधवांना लवकरच पेंशनचा लाभ’ या दै. नवराष्ट्रने दिलेल्या वृत्ताचे कात्रण सभागृहात झळकावत नवराष्ट्रचे आभार मानले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Navi mumbai municipal corporation 30 percent market space reserved for women self help groups

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
1

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

Navi Mumbai: कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवरून महासभेत प्रशासनाला धारेवर धरले; १५ दिवसांत कार्यवाहीचे निर्देश
2

Navi Mumbai: कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीवरून महासभेत प्रशासनाला धारेवर धरले; १५ दिवसांत कार्यवाहीचे निर्देश

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा
3

बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीने वैतागलायत? ‘या’ ३ सोप्या टिप्स वापरा आणि कायमची सुटका मिळवा

IRCTCचा मोठा स्ट्राईक! ९ कोटींहून अधिक खात्यांवर कारवाई; तिकीट काळाबाजाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय
4

IRCTCचा मोठा स्ट्राईक! ९ कोटींहून अधिक खात्यांवर कारवाई; तिकीट काळाबाजाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.