Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चिमूर बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य! एसटी चालकांची कसरत, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण

चिमूर बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे प्रवासी, चालक आणि इतर नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अपघाताचा धोकाही निर्माण होत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 04, 2026 | 01:53 PM
Chandrapur News: चिमूर बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य! एसटी चालकांची कसरत, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण

Chandrapur News: चिमूर बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य! एसटी चालकांची कसरत, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण

Follow Us
Follow Us:
  • बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांसह एसटी बसेसचीही मोठी गैरसोय
  • चालकांना खड्यांचा अंदाज घेत बसेस चालवाव्या लागत आहेत
  • बसमध्ये चढताना उतरतानाही प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे
चिमूर: प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी महामंडळाच्या चिमूर बसस्थानकाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांसह एसटी बसेसचीही मोठी गैरसोय होत आहे.

Payal Jhambre Suicide: त्या रात्री नक्की काय घडलं? सॉफ्टवेअर इंजिनिअर पायलच्या आत्महत्येमागचं थरारक आणि धक्कादायक सत्य समोर!

एकीकडे महामंडळाकडून लालपरी आणि राजमाता जिजाऊ यांसारख्या नव्या बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जात आहेत, तर दुसरीकडे या बसेसना चिमूर बसस्थानकातील खड्ड्यांतून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे नव्या बसेस आणि मोडकळीस आलेली बसस्थानक व्यवस्था, असे विरोधाभासी चित्र दिसून येत आहे. (फोटो सौजन्य – AI Created) 

बसस्थानकात प्रवेश करताना तसेच बाहेर पडताना चालकांना खड्यांचा अंदाज घेत बसेस चालवाव्या लागत आहेत. खड्ड्यांमुळे बसेसना मोठे धक्के बसत असून, वाहनांचे नुकसान होण्याची शक्यताही वाढली आहे. त्याचा थेट त्रास बसमधील प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

विशेषतः वृद्ध नागरिक, आजारी रुग्ण, शाळकरी विद्यार्थी आणि लहान मुलांसाठी बसस्थानकातील हा प्रवास त्रासदायक ठरत आहे. बसमध्ये चढताना उतरतानाही प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांत साचल्यास त्यांची खोली लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोकाही निर्माण होतो. प्रवाशांची गैरसोय आणि बसेसच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता संबंधित एसटी बसस्थानक परिसरातील खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा एखादी दुर्घटना प्रशासनाने तातडीने घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवालही प्रवासी उपस्थित करीत आहेत.

नव्या बसेस, पण बसस्थानकाची दुरवस्था कायम !

चिमूर हे तालुक्याचे महत्त्वाचे केंद्र असल्याने ग्रामीण भागातील नागरिक दररोज शिक्षण, उपचार, नोकरी आणि अन्य कामांसाठी बसस्थानकात येतात. मात्र, प्रवाशांची मोठी वर्दळ असूनही मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. नव्या बसेस आणि आधुनिक प्रवासाच्या घोषणा केल्या जात असताना बसस्थानकातील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त कधी मिळणार, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.

Raj Thackeray: ‘पुढच्या वर्षी पुन्हा एकदा…’, राज ठाकरेंनी ट्विट करत केली मोठी घोषणा; यंदा दीपोत्सव रद्द, नेमकं कारण काय?

चिमूर बसस्थानकाच्या डांबरीकरणासाठी विभागीय कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली असून, पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा सुरू आहे. – इमरान शेख, प्रभारी आगार व्यवस्थापक, चिमूर

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chimur bus stand in poor condition potholes make travel difficult for st buses and passengers hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

‘5 हजार रुपयांत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का?’ आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल
1

‘5 हजार रुपयांत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का?’ आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल

Beed: 5 हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सवाल
2

Beed: 5 हजार रुपयांत दिवाळी कशी साजरी करायची? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सवाल

Raigad News: महाडमध्ये दुष्काळाचे संकट! भातपीक करपले, जनावरांचा चाराही मिळेना… शेतकरी आर्थिक संकटात
3

Raigad News: महाडमध्ये दुष्काळाचे संकट! भातपीक करपले, जनावरांचा चाराही मिळेना… शेतकरी आर्थिक संकटात

Sainik School Admission 2027: सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची नोंदणी सुरू! ६ वी आणि ९ वीच्या प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सुरू
4

Sainik School Admission 2027: सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेची नोंदणी सुरू! ६ वी आणि ९ वीच्या प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.