Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमराठी चालकांचा व्यवहारिक मराठी शिकण्याकडे उत्स्फूर्त कल : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अस्मितेचा आणि माणुसकीच्या नात्यांचा सेतू आहे. अमराठी चालकांनी मराठी शिकण्यासाठी दाखविलेला उत्साह हा स्वागतार्ह आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 07, 2026 | 01:29 PM
अमराठी चालकांचा व्यवहारिक मराठी शिकण्याकडे उत्स्फूर्त कल; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक मुंबई : महाराष्ट्राच्या मातृभाषेचा सन्मान राखत आणि प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ व आत्मीय करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या अमराठी चालकांसाठीच्या व्यवहारिक मराठी शिकवणी वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मराठी भाषा शिकण्यासाठी अमराठी चालकांमध्ये दिसून येणारा उत्साह खरोखरच वाखाणण्याजोगा आहे, असे गौरवोद्गार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काढले. परिवहन विभागाच्या पुढाकारातून आणि कोकण मराठी साहित्य परिषद तसेच मुंबई साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १ जूनपासून मुंबई महानगर क्षेत्रात अमराठी चालकांसाठी व्यवहारिक मराठीचे विशेष वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी तब्बल साडेचार हजारांहून अधिक शिक्षकांची फळी उपलब्ध करून देण्यात आली असून, अनेक रिक्षा व टॅक्सी संघटनांनीही सामाजिक बांधिलकी जपत या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. शहरातील विविध भागांमध्ये चालकांच्या सोयीच्या वेळेनुसार वर्गांचे आयोजन करण्यात येत असून, या वर्गांमध्ये चालक स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहून मराठी भाषेतील दैनंदिन संवाद, व्यवहारातील शब्दप्रयोग आणि प्रवाशांशी सुसंवाद साधण्याची कला आत्मसात करत आहेत. मराठी शिकण्याची त्यांची तळमळ आणि जिद्द ही महाराष्ट्राच्या भाषिक ऐक्याचे सुंदर प्रतीक ठरत आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत अमराठी चालकांना व्यवहारिक मराठी शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निर्देशानुसार १६ ऑगस्ट पासून प्रवाशांशी मराठीत संवाद साधून न शकणाऱ्या चालकांना परिवहन विभागाच्या कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अर्थात , या निर्णयाचे महत्त्व ओळखून विविध चालक-मालक संघटनांनी स्वतःहून पुढाकार घेत प्रशिक्षण वर्गांचे आयोजन सुरू केले आहे. शासन, साहित्य संस्था आणि वाहतूक क्षेत्रातील संघटना यांच्या समन्वयातून हे अभियान आता एका व्यापक लोकचळवळीचे स्वरूप धारण करत आहे. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अस्मितेचा आणि माणुसकीच्या नात्यांचा सेतू आहे. अमराठी चालकांनी मराठी शिकण्यासाठी दाखविलेला उत्साह हा स्वागतार्ह असून, यामुळे प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक स्नेहपूर्ण, सुसंवादी आणि विश्वासार्ह होईल. मराठीचा गोडवा सर्वांच्या ओठांवर आणि व्यवहारात यावा, हीच या उपक्रमामागची प्रेरणा आहे.” मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबरच सामाजिक सलोखा आणि परस्पर संवादाची नवी दारे खुली करणारा हा उपक्रम राज्याच्या भाषिक एकात्मतेचा एक प्रेरणादायी अध्याय ठरत असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

Follow Us:

मुंबई : महाराष्ट्राच्या मातृभाषेचा सन्मान राखत आणि प्रवाशांशी संवाद अधिक सुलभ व आत्मीय करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या अमराठी चालकांसाठीच्या व्यवहारिक मराठी शिकवणी वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मराठी भाषा शिकण्यासाठी अमराठी चालकांमध्ये दिसून येणारा उत्साह खरोखरच वाखाणण्याजोगा आहे, असे गौरवोद्गार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काढले.

परिवहन विभागाच्या पुढाकारातून आणि कोकण मराठी साहित्य परिषद तसेच मुंबई साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १ जूनपासून मुंबई महानगर क्षेत्रात अमराठी चालकांसाठी व्यवहारिक मराठीचे विशेष वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी तब्बल साडेचार हजारांहून अधिक शिक्षकांची फळी उपलब्ध करून देण्यात आली असून, अनेक रिक्षा व टॅक्सी संघटनांनीही सामाजिक बांधिलकी जपत या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

शहरातील विविध भागांमध्ये चालकांच्या सोयीच्या वेळेनुसार वर्गांचे आयोजन करण्यात येत असून, या वर्गांमध्ये चालक स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहून मराठी भाषेतील दैनंदिन संवाद, व्यवहारातील शब्दप्रयोग आणि प्रवाशांशी सुसंवाद साधण्याची कला आत्मसात करत आहेत. मराठी शिकण्याची त्यांची तळमळ आणि जिद्द ही महाराष्ट्राच्या भाषिक ऐक्याचे सुंदर प्रतीक ठरत आहे.

येत्या १५ ऑगस्टपर्यंत अमराठी चालकांना व्यवहारिक मराठी शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निर्देशानुसार १६ ऑगस्ट पासून प्रवाशांशी मराठीत संवाद साधून न शकणाऱ्या चालकांना परिवहन विभागाच्या कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. अर्थात, या निर्णयाचे महत्त्व ओळखून विविध चालक-मालक संघटनांनी स्वतःहून पुढाकार घेत प्रशिक्षण वर्गांचे आयोजन सुरू केले आहे. शासन, साहित्य संस्था आणि वाहतूक क्षेत्रातील संघटना यांच्या समन्वयातून हे अभियान आता एका व्यापक लोकचळवळीचे स्वरूप धारण करत आहे.

यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अस्मितेचा आणि माणुसकीच्या नात्यांचा सेतू आहे. अमराठी चालकांनी मराठी शिकण्यासाठी दाखविलेला उत्साह हा स्वागतार्ह असून, यामुळे प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद अधिक स्नेहपूर्ण, सुसंवादी आणि विश्वासार्ह होईल. मराठीचा गोडवा सर्वांच्या ओठांवर आणि व्यवहारात यावा, हीच या उपक्रमामागची प्रेरणा आहे.”

मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबरच सामाजिक सलोखा आणि परस्पर संवादाची नवी दारे खुली करणारा हा उपक्रम राज्याच्या भाषिक एकात्मतेचा एक प्रेरणादायी अध्याय ठरत असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

Web Title: Non marathi drivers show a spontaneous inclination to learn functional marathi transport minister pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • Maharashtra ST Department
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा
1

Pratap Sarnaik: ‘आमदार मोठा की कायदा?’ बेकायदा बांधकामांवरून प्रताप सरनाईकांचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

NCMC Card ST Bus : NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा
2

NCMC Card ST Bus : NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा

Pratap Sarnaik: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश
3

Pratap Sarnaik: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश

Pratap Sarnaik: ‘विना वाहक’ बससेवा वाढवणार? एसटीचा आर्थिक डोलारा मजबूत करण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा नवा मंत्र
4

Pratap Sarnaik: ‘विना वाहक’ बससेवा वाढवणार? एसटीचा आर्थिक डोलारा मजबूत करण्यासाठी परिवहन मंत्र्यांचा नवा मंत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.