Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॅनहोल दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा; स्थानिक स्वराज्य संस्थांना बाल हक्क आयोगाचे निर्देश

open manholes accident prevention order: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उघडे मॅनहोल्स आणि साचलेल्या पाण्यामुळे बालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याने महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 03, 2026 | 08:30 PM
मॅनहोल दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करा; स्थानिक स्वराज्य संस्थांना बाल हक्क आयोगाचे निर्देश
Follow Us
Follow Us:
  • उघड्या मॅनहोल्समुळे वाढले दुर्घटनेचे प्रमाण
  • उपाययोजना करण्याचे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे निर्देश
  • सर्वेक्षण करून मजबूत झाकणांनी बंद करावीत
मुंबई: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उघडे किंवा नादुरुस्त मॅनहोल्स, साचलेले पाणी आणि त्यातून बालकांच्या जीवितास निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती व संबंधित स्थानिक प्रशासनाला तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अॅक्शन टेकन रिपोर्ट सात दिवसांच्या आत आयोगाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Mumbai High Court: भाजप सरकार मुर्दाबाद म्हटल्याने कोणी तडीपार होत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

अनेक ठिकाणी रस्त्यांवरील तसेच गृहनिर्माण संस्थांच्या परिसरातील मॅनहोल्स उघड्या किंवा तुटलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने साचलेल्या पाण्यामुळे उघडे मॅनहोल्स दिसून येत नसल्याने नागरिकांच्या, विशेषतः बालकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होत आहे. यापूर्वी अशा घटनांमध्ये बालकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर आयोगाने स्थानिक प्रशासनाला पुढील उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत. कार्यक्षेत्रातील सर्व मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पदपथ तसेच शाळा व अंगणवाड्यांच्या परिसरातील उघड्या किंवा नादुरुस्त मॅनहोल्सचे तातडीने सर्वेक्षण करून ती मजबूत झाकणांनी बंद करावीत. ज्या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती शक्य नसेल, तेथे बॅरिकेड्स उभारून रात्री स्पष्टपणे दिसतील असे धोक्याचे सूचना फलक लावावेत. सर्व गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक संकुलांना त्यांच्या परिसरातील मॅनहोल्स सुरक्षित ठेवण्याबाबत कडक सूचना द्याव्यात. पावसाळ्यात अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 24 तास कार्यरत हेल्पलाईन आणि तात्काळ कृती पथक सज्ज ठेवावे. राज्यातील एकाही बालकाला प्रशासकीय निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत गांभीर्याने कार्यवाही करावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच, करण्यात आलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अॅक्शन टेकन रिपोर्ट सात दिवसांच्या आत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मुंबईत पावसाचा हाहाकार! शाळा-कॉलेजेस बंद करा आणि कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या; शिंदेंच्या ‘या’ बड्या नेत्याचे BMC ला आवाहन

Web Title: Open manhole safety mumbai monsoon child rights commission directives maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • BMC
  • crime news mumbai
  • manhole

संबंधित बातम्या

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
1

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.