Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई युवक काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गिग वर्कर्सना पेट्रोलचे वाटप

राहुल गांधींचा वाढदिवस मुंबई युवक काँग्रेसने उत्साहात साजरा केला, यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि “गिग वर्कर्स सन्मान” उपक्रमांतर्गत अॅप- आधारित दुचाकी डिलिव्हरी सेवा देणाऱ्या गिग वर्कर्सना मोफत पेट्रोलचे वितरण करण्यात आले.

  • By विवेक
Updated On: Jun 19, 2026 | 05:50 PM
मुंबई युवक काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गिग वर्कर्सना पेट्रोलचे वाटप

मुंबई युवक काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गिग वर्कर्सना पेट्रोलचे वाटप

Follow Us
Follow Us:

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा वाढदिवस काँग्रेस पक्षाकडून विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते राहुल गांधी यांच्यावरील जनमानसाची ‘शिदोरी’ मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रमेश शेट्टी, सरचिटणीस अभिजित सपकाळ, गुरबिंदरसिंग बच्छेर, प्रदेश सरचिटणीस व शिदोरीचे प्रबंधक संपादक अनंत मोहोड, कार्यकारी संपादक सुनिल खांडगे आदी उपस्थित होते.

गिग वर्कर्सना मोफत पेट्रोलचे वितरण

राहुल गांधींचा वाढदिवस मुंबई युवक काँग्रेसनेही उत्साहात साजरा केला, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झिनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली व मुंबई उत्तर मध्य जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखील रुपारेल यांच्या पुढाकाराने “गिग वर्कर्स सन्मान” उपक्रमांतर्गत अॅप- आधारित दुचाकी डिलिव्हरी सेवा देणाऱ्या गिग वर्कर्सना मोफत पेट्रोलचे वितरण करण्यात आले.

‘परशुराम अवतार आणि हातात संविधान,’ काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांनी कुलाबा विधानसभा मतदारसंघातील ‘मुंबई पब्लिक स्कूल’च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. शिक्षणाला प्रोत्साहन देऊन, युवा पिढीला सक्षम करून आणि समाजसेवेप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित करून हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई युवक काँग्रेसचे संघटन सरचिटणीस तेजस चंदूरकर आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्या शुभेच्छा

“राहुल गांधी हे देशाचे भविष्य आहेत. जनता त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पहात आहे. मागील १२ वर्षात भाजपा सरकारने जनतेची घोर फसवणूक केली असून समाजातील एकही घटक या सरकारच्या कामावर समाधानी नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या असून सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे. गरिब अधिक गरिब होत चालला आहे तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला अमेरिकेच्या दावणीला बांधले आहे. लोकशाही व संविधान पायदळी तुडवून हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरु आहे. भाजपा सरकारला जनता कंटाळली असून यातून राहुल गांधी यांचे नेतृत्वच देशाला तारू शकेल, असा विश्वास आहे. आज राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना पंतप्रधानपदावर बसवणे हाच काँग्रेस कार्यकर्त्यांचा संकल्प आहे”, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Aaditya Thackeray: ‘तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं…’; ६ खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचा पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Web Title: Rahul gandhi birthday mumbai youth congress celebration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • Congress
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
1

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
2

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात
3

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
4

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.