Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BEST Strike Mumbai : 21 जूनच्या नीट परीक्षेवर बेस्ट संपाचे सावट; राहुल शेवाळेंनी व्यक्त केली चिंता

बेस्ट उपक्रमाच्या संपावर तातडीने मध्यस्थी करून तोडगा काढण्याची मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. बेस्टचा संप 21 जूनपर्यंत सुरू राहिल्यास राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो,

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 19, 2026 | 06:30 PM
21 जूनच्या नीट परीक्षेवर बेस्ट संपाचे सावट; राहुल शेवाळेंनी व्यक्त केली चिंता

21 जूनच्या नीट परीक्षेवर बेस्ट संपाचे सावट; राहुल शेवाळेंनी व्यक्त केली चिंता

Follow Us
Follow Us:
  • 21 जूनच्या नीट परीक्षेवर बेस्ट संपाचे सावट
  • राहुल शेवाळेंनी व्यक्त केली चिंता
  • पर्यायी वाहतूक व्यवस्थेची मागणी
मुंबई : मुंबईत, १२ संघटनांची संयुक्त संघटना असलेल्या ‘संयुक्त कामगार कृती समिती’च्या बॅनरखाली बेस्टच्या (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन) कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (18 जून) मध्यरात्रीपासून संप सुरू केला आहे. प्रशासनाने त्यांच्या मागण्यांवर निर्धारित वेळेत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही, असा आरोप समितीने केला आहे. वास्तविक पाहता, बेस्टचे बजेट बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) बजेटमध्ये विलीन करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित कायदेशीर देणी एकरकमी देणे, २०१६-२०२६ या वर्षांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे आणि बेस्टच्या मालकीच्या बसेसची संख्या ६,००० पर्यंत वाढवणे, या काही प्रमुख मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. याशिवाय, वेतनवाढ, निवृत्तीवेतनाचे लाभ आणि इतर प्रलंबित देणी अदा करावीत.

Mumbai BEST Bus Strike: बेस्ट कर्मचाऱ्यांची 100 टक्के बंदची हाक, २७६६ पैकी केवळ ३२ बस रस्त्यावर, मुंबईकरांचे हाल

याचदरम्यान आता, बेस्ट उपक्रमाच्या संपामध्ये तातडीने मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी लेखी मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संपावर त्वरित तोडगा काढला नाही, तर त्याचा फटका रविवारी, ( 21 जून) नीट परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना होऊ शकेल, अशी चिंता शेवाळे यांनी आपल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. तसेच, सदर संप 21 जूनपर्यंत मिटला नाही, तर परिक्षार्थींसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्याची विनंतीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

शेवाळे यांनी निवेदनात म्हटले आहे की, बेस्ट उपक्रमातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे गुरुवार मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरातील वाहतुकीवर विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे. त्यातच, येत्या रविवारी म्हणजे 21 जून रोजी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी, परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मुंबईतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बेस्ट बसवर अवलंबून असतात. मात्र, बेस्टचा संप लांबला, तर या विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल.आधीच, पेपरफुटीमुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना, बेस्ट बसच्या संपामुळे ऐन परीक्षेच्या दिवशीच मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, अशी भीती शेवाळे यांनी व्यक्त केली आहे.

विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन, नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर, बेस्ट संपामध्ये तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. तसेच, संपावर तोडगा न निघाल्यास, नीट परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रात मेस्मा लागू

संपाच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा (मेस्मा) लागू केला आहे. याअंतर्गत, बेस्ट कर्मचाऱ्यांना संप करण्यास किंवा सामूहिक रजा घेण्यास मनाई आहे. अत्यावश्यक सेवा कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहतील, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, शुक्रवार सकाळपासून मुंबईच्या रस्त्यांवरून बेस्ट बसेस जवळजवळ गायब आहेत. बेस्ट मुंबईत बससेवा चालवते आणि दक्षिण मुंबईला वीजपुरवठाही करते. कर्मचाऱ्यांनी इशारा दिला आहे की, त्यांच्या मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास बससेवा तसेच वीजपुरवठा विस्कळीत होऊ शकतो.

Pratap Sarnaik : आता काय खैर नाही…! मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कारवाई

Web Title: Rahul shewale demands immediate solution to best strike and transport for neet exam students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Mumbai
  • rahul shewale

संबंधित बातम्या

Bhima Koregaon Case प्रकरणी एनआयएकडून तीन जणांची चौकशी; मुंबई प्रेस क्लबच्या माजी सदस्यांना समन्स
1

Bhima Koregaon Case प्रकरणी एनआयएकडून तीन जणांची चौकशी; मुंबई प्रेस क्लबच्या माजी सदस्यांना समन्स

Mumbai BEST Bus Strike: बेस्ट कर्मचाऱ्यांची 100 टक्के बंदची हाक, २७६६ पैकी केवळ ३२ बस रस्त्यावर, मुंबईकरांचे हाल
2

Mumbai BEST Bus Strike: बेस्ट कर्मचाऱ्यांची 100 टक्के बंदची हाक, २७६६ पैकी केवळ ३२ बस रस्त्यावर, मुंबईकरांचे हाल

Mumbai News : फक्त आर्थिक नाही, आता मुंबई ‘कॅट कॅपिटल’, काय म्हणतोय Insta Mart चा Viral रिपोर्ट?
3

Mumbai News : फक्त आर्थिक नाही, आता मुंबई ‘कॅट कॅपिटल’, काय म्हणतोय Insta Mart चा Viral रिपोर्ट?

Priyanka Chaturvedi: ‘ते ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन…’; खासदारांच्या फोडाफोडीवर प्रियंका चतुर्वेदीचे मोठे विधान
4

Priyanka Chaturvedi: ‘ते ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन…’; खासदारांच्या फोडाफोडीवर प्रियंका चतुर्वेदीचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.