Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray News: ‘याचं उत्तर एकनाथ शिंदेंच देऊ शकतात’; मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचे सूचक विधान

मराठा आंदोलकांमुळे मुंबईत मोठी वाहतूक कोंडी झाली होती, त्याचा मुंबईकरांना त्रास होतोय, असा प्रश्न उपस्थित केला असता राज ठाकरे म्हणाले, मुंबईकरांना त्रास होतोय वगैरे गोष्टींवर फक्त एकनाथ शिंदेच बोलू शकतात.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 30, 2025 | 03:08 PM
Raj Thackeray News: ‘याचं उत्तर एकनाथ शिंदेंच देऊ शकतात’; मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचे सूचक विधान
Follow Us
Close
Follow Us:
  • मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे आझाद  मैदानात उपोषण
  • राज ठाकरेंची प्रतिक्रीया
  • मराठा आंदोलक मुंबईत परत का आले- राज ठाकरेंचा सवाल

गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे आणि या प्रश्नासाठी आंदोलनं व उपोषणं करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आपल्या मागणीसाठी मुंबईत धडकले आहेत. शुक्रवारी (२९ ऑगस्ट) त्यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, हजारो मराठा आंदोलकांच्या उपस्थितीमुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

या घडामोडींवर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रसारमाध्यमांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी उत्तर देताना म्हटले, “तुमच्या आणि लोकांच्या मनातले सर्व प्रश्न यांची उत्तरं केवळ एकच व्यक्ती देऊ शकते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच या घटनांवर योग्य प्रतिक्रिया देऊ शकतात.”

Thane News : अतिधोकादायक इमारती तातडीने रिकाम्या कराव्यात; मनपा आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत माध्यमांनी राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. मराठा विरुद्ध ओबीसी या आरक्षणाच्या वादाकडे आपण कसं पाहता? असा प्रश्न विचारण्यात आला.यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “ या सगळ्या गोष्टींची उत्तरे तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतील, ते तुमच्यासमोर येतील तेव्हा तुम्ही हे त्यांनाच विचारा. आरक्षणाबाबत माजी भूमिका काय आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता ते सगळं जुनं झालं. मात्र, सध्याच्या घटनांवर केवळ एकनाथ शिंदे हेच बोलू शकतात.”

मराठा आंदोलकांमुळे मुंबईत मोठी वाहतूक कोंडी झाली होती, त्याचा मुंबईकरांना त्रास होतोय, असा प्रश्न उपस्थित केला असता राज ठाकरे म्हणाले, मुंबईकरांना त्रास होतोय वगैरे गोष्टींवर फक्त एकनाथ शिंदेच बोलू शकतात. मागच्या वेळी एकनाथ शिंदे हेच नवी मुंबईला गेले होते ना? त्यांनी नवी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला होता. मग मराठा आंदोलक मुंबईत परत का आले. असा प्रतिप्रश्न करत राज ठाकरेंनी या सर्व गोष्टींची उत्तरं केवळ एकनाथ शिंदे देऊ शकतात.” असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कोर्टात चेंडू टाकला.

ऐन गणेशोत्सवात Allu Arjun ला बसला धक्का, अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावलं

दरम्यान, राज ठाकरेंची ही प्रतिक्रीया, मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात. त्यांचे हे विधान सूचक मानले जात आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर गंभीर आरोप केला. “महायुती सरकारमध्ये तीन गट आहेत. त्यामध्ये शिंदे गटाचा विषय वेगळा आहे. फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे आंदोलकांना वेगळ्या प्रकारे मदत करत आहेत.” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच, “देवेंद्र फडणवीस यांची भूमिका परशुराम महामंडळाच्या संदर्भात वेगळी आहे, तर अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ राहिले आहेत. त्यांची कोणतीही ठोस भूमिका समोर आलेली नाही. अशा परिस्थितीत सरकारकडून राजकीय इच्छाशक्ती अपेक्षित तरी कुठून?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Raj thackeray news only eknath shinde can answer this raj thackerays suggestive statement on maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Manoj Jarange
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Navi Mumbai :  मनोज जरांगे यांच्या तब्येतीवरून मराठा आंदोलक संतप्त
1

Navi Mumbai : मनोज जरांगे यांच्या तब्येतीवरून मराठा आंदोलक संतप्त

Karjat News : मराठा क्रांती लढ्यासाठी कर्जतकरांचा पाठींबा; मराठा आंदोलकांसाठी केली चटणी भाकरीची व्यवस्था
2

Karjat News : मराठा क्रांती लढ्यासाठी कर्जतकरांचा पाठींबा; मराठा आंदोलकांसाठी केली चटणी भाकरीची व्यवस्था

Navi Mumbai : वाहतूक पोलीस अजिबात सहकार्य करत नाहीत, आंदोलनकर्त्यांची नाराजी
3

Navi Mumbai : वाहतूक पोलीस अजिबात सहकार्य करत नाहीत, आंदोलनकर्त्यांची नाराजी

Manoj Jarange News: ‘आता सरकारला दोन मिनिटंही मिळणार नाही’; शिंदे समिती फेल, मनोज जरांगे ठाम
4

Manoj Jarange News: ‘आता सरकारला दोन मिनिटंही मिळणार नाही’; शिंदे समिती फेल, मनोज जरांगे ठाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.