Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray on KDMC: कल्याण-डोंबिवलीच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा संताप; “बाळासाहेब आज असते तर…”

बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. यावेळी राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय स्थितीवर संताप व्यक्त करत बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 23, 2026 | 09:26 PM
'मिसिंग लिंकवर प्रश्न विचारला तर राजकारण?' राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल; सभेत केली मिमिक्री

'मिसिंग लिंकवर प्रश्न विचारला तर राजकारण?' राज ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल; सभेत केली मिमिक्री

Follow Us
Follow Us:

 

  • कल्याण-डोंबिवलीच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा संताप
  • “बाळासाहेब आज असते तर…”
  • एकाच मंचावर ठाकरे कुटुंब
Maharashtra Politics: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी शुभारंभ आज मुंबईतील षन्मुखानंद सभागृहात एका दिमाखदार सोहळ्याने झाला. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकाच मंचावर येणे. बऱ्याच काळानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. मात्र, या सोहळ्यात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, विशेषतः कल्याण-डोंबिवलीतील घडामोडींवर अत्यंत जळजळीत शब्दांत संताप व्यक्त केला.

‘बाळासाहेब आज असते तर…’

राज्यातील सध्याच्या फोडाफोडीच्या आणि ‘खोक्यांच्या’ राजकारणावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, “आज देशात आणि महाराष्ट्रात गुलामांचा बाजार निर्माण झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी जे सुरू आहे, ते पाहून मन विषण्ण होते. मुंबईसह कल्याण-डोंबिवली आणि इतर ठिकाणचा हा राजकीय बाजार पाहून मला अक्षरशः शिसारी आली आहे. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मला मनापासून वाटतंय की बाळासाहेब आज आपल्यात नाहीत तेच बरं झालं. जर ते आज असते आणि त्यांनी हे सगळं पाहिलं असतं, तर ते किती व्यथित झाले असते?”

व्यंगचित्रकार बाळासाहेबांच्या एकाग्रतेचा किस्सा

बाळासाहेबांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करताना राज ठाकरेंनी त्यांच्यातील कलावंताच्या आठवणींना उजाळा दिला. “बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट किंवा राजकारणी म्हणून आपण ओळखतोच, पण त्यापलीकडे ते एक महान व्यंगचित्रकार होते. बाहेर जगात कितीही मोठी राजकीय उलथापालथ झाली किंवा संकटे आली, तरी बाळासाहेब जेव्हा व्यंगचित्र रेखाटायला बसायचे, तेव्हा त्यांच्या मनातली शांती ढळत नसे. त्या बाह्य परिस्थितीचा परिणाम त्यांच्या व्यंगचित्राच्या एकाही रेषेवर कधीच उमटला नाही,” असे राज यांनी नमूद केले.

Maharashtra Politics: “… आज बाळासाहेब नाहीयेत ते बरंय”; मनसे अध्यक्ष राज ठाकरे कडाडले

शिवसेनेचा पहिला महापौर आणि ‘मुस्लिम लीग’चा संदर्भ

कार्यक्रमात १९७३ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रंजक इतिहासही चर्चिला गेला. त्यावेळी काँग्रेसकडे बहुमत असतानाही बाळासाहेबांनी शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी मुस्लिम लीग आणि इतर छोट्या पक्षांशी युती केली होती. या ऐतिहासिक निर्णयावर राज ठाकरे म्हणाले की, “त्यावेळी विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. पण बाळासाहेबांनी ठणकावून सांगितले होते की, काँग्रेस नावाच्या सापाला ठेचण्यासाठी आम्ही मुस्लिम लीग नावाच्या नागाचा वापर करत आहोत.” हा किस्सा सांगून त्यांनी बाळासाहेबांच्या रोखठोक राजकारणाची आठवण करून दिली.

एकाच मंचावर ठाकरे कुटुंब

या कार्यक्रमात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे आणि संजय राऊत यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. राज ठाकरे यांनी ‘सामना’ वृत्तपत्रात बाळासाहेबांवर लिहिलेल्या लेखाचाही उल्लेख केला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अवघे ठाकरे कुटुंब आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

KDMC Politics: आकडे बोलतात! केडीएमसीत खरा बॉस भाजपाच, स्ट्राईक रेटमध्ये सर्वात सरस

Web Title: Raj thackeray speech balasaheb centenary shanmukhananda hall kalyan dombivli politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 09:26 PM

Topics:  

  • kalyan dombivli muncipal corporation
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
1

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
2

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
3

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
4

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.