आकडे बोलतात! केडीएमसीत खरा बॉस भाजपाच, स्ट्राईक रेटमध्ये सर्वात सरस (Photo Credit- X)
तिथल्या 129 नगरसेवकांच्या जागांपैकी भाजपाने 54 जागा लढवल्या तर शिवेसनेने 65 जागा लढवल्या. भाजपाने 54 पैकी पन्नास जागा जिंकताना तब्बल 92.6 टक्के इतका जबर स्ट्रार्ईक रेट गाठला. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 65 पैकी 53 ठिकाणी जय मिळाला. म्हणजेच सेनेचा स्ट्राईक रेट हा 81.5 टक्के इतका राहिला.
भाजपाने त्यांच्या पेक्षा लढवलेल्या जागांपैकी दहा टक्के अधिक ठिकामी विजय खेचून आणला ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही याकडे स्थानिक भाजपा नेते लक्ष वेधत आहेत. जरी डॉ. श्रीकांत शिंदे हे महायुतीचाच माहपौर होईल असे वारंवार जरी सांगत असले तरी, प्रत्यक्षात त्यांचे काही निराले डाव असावेत अशी शंका घेण्यास वावा आहे. शिवसेनेने अचानक गट स्थापनेच्या टप्प्यावर मनसेचे स्थानिक नेते माजी आमदार राजू पाटील यांना सोबत घेत, पाच नगरसेवकांच्या मनसे गटाचे समर्थन शिंदे सेनेसाठी मिळवल्याने पुन्हा प्रश्नचिन्ह तयार झाले आहे.
केडीएमसीमध्ये महायुतीच्या विजयाची लाट निर्विवाद आहे, परंतु आकडेवारी युतीमधील खऱ्या नेतृत्वाचे चित्र स्पष्ट करते. शिवसेनेने जास्त जागा लढवल्या असल्या तरी, भाजपने जागांची निवड आणि प्रचारामध्ये अचूक नियोजन करून कमी उमेदवारांतूनही उत्कृष्ट निकाल दिला याचीही नोंद भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानेही घेतलेली आहे, याकडेही जाणकार लक्ष वेधतात. या निकालातून असेही स्पष्ट होते आहे की अधिक कार्यक्षमता, उमेदवारांचा चांगला दर्जा, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर आणि मतदारांशी असलेली मजबूत नाळ यातून भजापाने घवघवित यश संपादन केले आहे.
जाणकार असेही सांगतात की अधिक स्ट्राईक रेटमध्येच कल्याण डोंबिवलीचा खरा बिग बॉस कोण हे स्पष्ट होते आहे. जर भाजपाने स्वबळावर ही निवडणूक लढवली असती तर त्यांचेच स्पष्ट बुहमत प्रस्थापित झाले असते, पण युतीचा धर्म भाजपाने पाळला. आता जवळपास बरोबरीने जागा मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाला केडीएमसीच्या सत्तेत तितकाच मोठा व स्पष्ट वाटा देणे हे ही नैसर्गिक न्यायाच्य दृष्टीने योग्य ठरते.
कल्याण-डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंना एकाकी घेरण्याचा भाजपाचा डाव






