मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो- यूट्यूब)
उद्धव आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर
षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला कार्यक्रम
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम
Raj Thackeray: मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्रित आल्याचे दिसून आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राज ठाकरे काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित आयोजित कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “निवडणुकीच्या अगोदर उद्धव आजारी पडले होते. आता मी आजारी पडलो आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यांच्यावर बोलायच ठरवले तर मी आणि उद्धव त्यांच्यावर अनेक तास बोलू शकतो. ”
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांना कोणत्या शब्दात मांडू हे समजत नाही. जगात बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी एकही कलाकार झाला नाही. बाळासाहेब ठाकरे देशातील सर्व राजकारण्यांपेक्षा वेगळे आहेत. आजची राजकारणाची परिस्थिती पाहिली की, आज मला वाटत की बाळासाहेब नाहीयेत ते बरे आहे. तो माणूस किती व्यथित झाला असता, त्याला किती त्रास झाला असता? मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा ते पक्ष सोडणे नव्हते, तर घर सोडणे होते. 20 वर्षांमध्ये मला आणि उद्धवला अनेक गोष्टी उमजल्या.”
1973 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडे बहुमत होते. तर दुसरीकडे, शिवसेनेकडे केवळ 40 जागा होत्या. त्यामुळे शिवसेनेचा महापौर बसणार का? असा सर्वांनाच प्रश्न पडला होता. मात्र, बाळासाहेब ठाकरेंच्या मनात एक वेगळीच राजकीय खेळी आकार घेत होती.
मुंबईत काँग्रेसचा महापौर बसू नये म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी एक वेगळीच राजकीय खेळी खेळली. शिवसेनेचा महापौर मुंबईत यावा यासाठी बाळासाहेबांनी चक्क मुस्लिम लीग इतर लहान पक्षांसोबत युती केली. यामुळे अर्थातच राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली. विरोधकांनी ठाकरेंना धारेवर धरले. मोठी टीकेची झोड उठली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले,”काँग्रेस नावाच्या सापाला ठेवण्यासाठी आम्ही मुस्लिम लीग नावाच्या नागाचा वापर करत आहोत.”






