Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Who is Shaina NC: गिनीज बुकमध्ये नोंद, भाजपच्या प्रवक्त्या, शिंदे गटाकडून तिकीट; कोण आहेत शायना एनसी?

शायना एनसी  या केवळ शिंदे गटाच्या उमेदवारच नाही तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध फॅशन डिझायनरही आहेत. शायना मुस्लिम कुटुंबातून आल्या आहे. 18 वर्षांच्या असताना त्यांनी फॅशन डिझाईन करायला सुरुवात केली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 29, 2024 | 10:13 AM
Who is Shaina NC: गिनीज बुकमध्ये नोंद, भाजपच्या प्रवक्त्या, शिंदे गटाकडून तिकीट; कोण आहेत शायना एनसी?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी राजकीय पक्षांचे राजकीय डावपेचामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचं  ताजं उदाहरण म्हणजे भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी.  सोमवारी सकाळ अचानक भाजपमध्ये असलेल्या शायना यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या  प्रवेश केला. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला. पक्षात प्रवेश करताच शायना यांना शिंदे गटाच्या शिवसेनेकडून मुंबादेवी मतदारसंघातून  तिकीटही मिळाले.

तिकीट मिळाल्यावर काय म्हणाल्या शायना एनसी?

शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी मंगळवारी युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती नेतृत्वाचे आभार मानले मुंबईतील जनतेच्या हितासाठी आपण कटिबद्ध आहोत. निवडणूक जिंकल्यानंतर त्या आपल्या मुंबईकरांचा आवाज सभागृहात बुलंद करणार असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा:  Shrinivas Vanga : “आत्महत्येचा विचार मनात येऊ लागलाय…” असं म्हणणारे श्रीनिवास वनगा

तर, शिवसेनेकडून आपल्या उमेदवारीबाबत बोलताना  त्या म्हणाल्या की, कुठून उमेदवार उभा करायचा हे नेहमीच महायुतीचे नेतृत्व ठरवते.  मला फक्त आमदार व्हायचे नाही, तर जनतेचा आवाज बनायचे आहे. मी लोकांना खात्री देते की माझ्याकडे कोणताही वैयक्तिक सहाय्यक (पीए) नाही. तरीही मी सगळ्यांच्या फोन कॉल्सला उत्तर देते.

कोण आहे शायना एनसी?

शायना एनसी  या केवळ शिंदे गटाच्या उमेदवारच नाही तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध फॅशन डिझायनरही आहेत. शायना मुस्लिम कुटुंबातून आल्या आहे. 18 वर्षांच्या असताना त्यांनी फॅशन डिझाईन करायला सुरुवात केली. शायना एक बुटीक देखील चालवतात. त्याच्या बुटीकमध्ये अनेक नायिका म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय, जुही चावला आणि महिमा चौधरी यांसारख्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे पोषाख  शायना यांनी स्वत:  डिझाइन केलेले आहेत.  शायना यांच्या डिझाइन केलेल्या साड्या खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांनी सर्वात वेगवान साडी नेसण्याचा विश्वविक्रम केला आहे.

हेही वाचा:  बॉर्डर गावस्कर ट्रॉफीआधी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंचा क्रिकेटला रामराम!

फॅशन डिझायनिंगसोबतच शायना यांनी राजकारणातही प्रवेश केला. दिवंगत भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे  यांच्या उपस्थितीत त्यांनी 14 सप्टेंबर 2004 रोजी शाईनाचा भाजपमध्ये समावेश केला.  गेल्या 20 वर्षांपासून त्या भाजपमध्ये होत्या.   मात्र, 28 ऑक्टोबर रोजी त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. फेब्रुवारी 2007 मध्ये त्यांना मुंबई भाजपचे प्रवक्ते बनवण्यात आले. मार्च 2010 मध्ये त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या झाल्या. एप्रिल 2013 मध्ये भाजपने शाय़ना भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता बनवण्यात आले.

हेही वाचा:  Gopal Shetty Rebellion: देवेंद्र फडणवीसांची डोकेदुखी वाढणार; बडा नेता करणार बंडखोरी

Web Title: Recorded in guinness book ticket from shinde group who is shayna nc nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 10:13 AM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Shivsena News : महाराष्ट्राचे धुरंदर विरुद्ध ‘दलिंदर आणि बिलंदर’ जोडी’, ज्योती वाघमारे यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात
1

Shivsena News : महाराष्ट्राचे धुरंदर विरुद्ध ‘दलिंदर आणि बिलंदर’ जोडी’, ज्योती वाघमारे यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात

Mira Bhayander : उत्पन्न लाखात मात्र संपत्ती करोडोंची ; पालिकेतील सत्तेचे लाभार्थी ठरलेले माजी नगरसेवक
2

Mira Bhayander : उत्पन्न लाखात मात्र संपत्ती करोडोंची ; पालिकेतील सत्तेचे लाभार्थी ठरलेले माजी नगरसेवक

पुनर्विकासासंबंधी अडचणींसाठी ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ची स्थापना करणार; राघवेंद्र बाप्पु मानकर यांची माहिती
3

पुनर्विकासासंबंधी अडचणींसाठी ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ची स्थापना करणार; राघवेंद्र बाप्पु मानकर यांची माहिती

Political News: राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेपूर्वीच मनसेला मोठा धक्का, ‘या’ बड्यानेत्याने हाती घेतला भाजपचा झेंडा
4

Political News: राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेपूर्वीच मनसेला मोठा धक्का, ‘या’ बड्यानेत्याने हाती घेतला भाजपचा झेंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.