Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांना दिलासा! पालिका रुग्णालयांत लवकरच सुरू होणार MRI सेवा, आरोग्य व्यवस्थेला मिळणार मोठी ताकद

आता मुंबईतील रुग्णांना MRI साठी खाजगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागणार नाही. कारण महापालिकेच्या केईएम, नायर, कूपर आणि सायन या चार महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक एमआरआय सेवा सुरू केली जाणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 20, 2026 | 02:14 PM
मुंबईकरांना दिलासा! पालिका रुग्णालयांत लवकरच सुरू होणार MRI सेवा, आरोग्य व्यवस्थेला मिळणार मोठी ताकद
Follow Us
Follow Us:
  • KEM ते Sion… मुंबईतील 4 मोठ्या रुग्णालयांत मिळणार अत्याधुनिक MRI सुविधा
  • खासगी सेंटरवर खर्च थांबणार! पालिका रुग्णालयांत MRI सेवा अंतिम टप्प्यात
  • मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांसाठी MRI सेवा आता स्वस्तात उपलब्ध
मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये लवकरच एमआरआय सेवा उपलब्ध होणार असून यासाठी आवश्यक टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संबंधित कंत्राटदाराला (सर्वात कमी दर) आधारावर काम देण्यात आले असून प्रत्येक रुग्णालयासाठी स्वतंत्र वर्क ऑर्डर जारी करण्यात आली आहे, अशी माहिती प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली. यामुळे मुंबईतील सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, महानगरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Mumbai News: परदेशी पर्यटकांच्या व्हिडीओचा इम्पॅक्ट! वांद्रे रेल्वे स्थानकावरील अतिक्रमणांवर रेल्वेचा हातोडा

महापालिकेच्या केईएम, नायर, कूपर आणि सायन या चार महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक एमआरआय सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांना खासगी केंद्रांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार असून, कमी खर्चात आणि वेळेत निदान होण्यास मदत होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

मुंबई महापालिकेकडून प्रक्रियेला गती

एमआरआय ही अत्यंत महत्त्वाची निदान चाचणी असून मेंदू, मणका, स्नायू तसेच अंतर्गत अवयवांशी संबंधित आजारांचे अचूक निदान करण्यासाठी ती उपयुक्त ठरते. मात्र, आतापर्यंत पालिका रुग्णालयांमध्ये ही सुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. एमआरआय सेवेसाठी मागील काही वर्षापासून सातत्याने मागणी होत होती. विधिमंडळाच्या अधिवेशनातही या मुद्द्यावर वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने या प्रक्रियेला गती देत टेंडर पूर्ण करून आता प्रत्यक्ष सेवा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.

रुग्णालयांमध्ये महापालिकेच्या एमआरआय सेवा सुरू करण्यासाठीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. टेंडर प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून वर्क ऑर्डरही जारी करण्यात आल्या आहेत. ही सेवा सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांना कमी खर्चात आणि जलदगतीने निदानाची सुविधा मिळेल. तसेच रुग्णालयांवरील ताण कमी होऊन आरोग्यसेवा अधिक सक्षम होईल. – डॉ. शैलेश मोहिते, संचालक, पालिका प्रमुख रुग्णालये

Mumbai Gas Shortage: गॅसअभावी ८०० कैद्यांच्या जेवणावर संकट, भायखळा तुरुंगात दररोज ८ सिलिंडरची गरज; सरपणासाठी लाकडाची व्यवस्था

एमआरआय उपलब्ध झाल्यास काय?

  • वेटिंग लिस्ट कमी होणार सध्या असलेली दीर्घ प्रतीक्षा यादी मोठ्या प्रमाणात घटणार
  • जलद निदान आजारांचे लवकर व अचूक निदान होणार
  • कमी खर्च – खासगी केंद्रांच्या तुलनेत स्वस्त दरात सेवा
  • स्थानिक पातळीवर सुविधा – शहरांतब सहज उपलब्धता
  • रुग्णांचा वेळ वाचणार अपॉइंटमेंटसाठी होणारा विलंब कमी.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Relief for mumbai residents mri services to start soon in civic hospitals boosting public healthcare mumbai news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • BMC
  • Marathi News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
3

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
4

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.