Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar On Manoj Jarange Patil: “दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर…”, रोहित पवारांचा गंभीर आरोप

Rohit Pawar on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले असून याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 29, 2025 | 11:56 AM
Ncp mla rohit pawar target mahayuti government over maratha reservation protest

Ncp mla rohit pawar target mahayuti government over maratha reservation protest

Follow Us
Close
Follow Us:

Manoj Jarange on Maratha Arakshan News in Marathi: मराठा आरक्षणासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करणारे मनोज जरांगे पाटील आज (२९ ऑगस्ट) सकाळी मुंबईत दाखल झाले. मुंबईत शेकडो गाड्यांचा ताफा आणि लाखो मराठा आंदोलक जमले असून सीएसएमटी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. याच दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

Maratha Jarange Maratha Arakshan: आझाद मैदानात मनोज जरांंगेचे उपोषण सुरू

रोहित पवार यांनी एक्स पोस्ट काय म्हणाले?

आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल.

आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने… pic.twitter.com/dBB9D5V8py — Rohit Pawar (@RRPSpeaks) August 29, 2025

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात.

या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा!

मनोज जरांगेंना एकाच दिवसाची परवानगी

आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगेंना एका वेळी एकाच दिवसाची परवानगी मिळालीय. शनिवारी, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी परवानगी मिळणार नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आज एकच दिवस जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करावं लागणार आहे. एका दिवसात आंदोलन कसं करणार, असा सवाल जरांगेंनी सरकारला केलाय. आणखी काही दिवसांची परवानगी मागणार असल्याचं सांगितलं जातंय. पण तशी परवानगी मिळाली तरी परवा शनिवार असल्यानं नियमानुसार जरांगेंना आजनंतर सलग आंदोलन करता येणार नाही. त्यामुळे शनिवारी, रविवारी जरांगेंचा मुक्काम कुठे असणार हा प्रश्न आहे.

Urjit Patel News: उर्जित पटेल यांची IMF च्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती: मोदी सरकारने दिली मंजुरी

Web Title: Rohit pawar on manoj jarange patil mumbai morcha government orders closure of food stalls no facilities in azad maidam rohit pawar makes serious allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 11:56 AM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Mumbai
  • rohit pawar

संबंधित बातम्या

मतदानाऐवजी थेट बोली लावा ; मतचोरीवरून रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर घणाघात
1

मतदानाऐवजी थेट बोली लावा ; मतचोरीवरून रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर घणाघात

Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २२ ते २६ डिसेंबरपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा, कधी, कुठे जाणून घ्या
2

Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २२ ते २६ डिसेंबरपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा, कधी, कुठे जाणून घ्या

India Financial Capital: मुंबई नव्हे, तर ‘हे’ शहर बनतेय भारताची नवी आर्थिक राजधानी; डिजिटल अर्थव्यवस्थेची नवी ओळख 
3

India Financial Capital: मुंबई नव्हे, तर ‘हे’ शहर बनतेय भारताची नवी आर्थिक राजधानी; डिजिटल अर्थव्यवस्थेची नवी ओळख 

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक
4

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.