Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ८४८ एकर जमिनीचा प्रश्न मार्गी लागणार? राज्यमंत्री योगेश कदम ॲक्शन मोडमध्ये

Sanjay Gandhi National Park 848 Acres Land Demarcation: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील ८४८ एकर जमिनीच्या हद्द निश्चितीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांनी सोसायटीधारकांना भूमी अभिलेख विभागाकडे तातडीने अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 14, 2026 | 09:16 PM
Sanjay Gandhi National Park 848 Acres Land

Sanjay Gandhi National Park 848 Acres Land

Follow Us
Follow Us:
  • योगेश कदमांचा मोठा निर्णय
  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील जमिनीचे सर्वेक्षण होणार
  • ८४८ एकरांसाठी प्रशासनाला तातडीचे आदेश
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील ८४८ एकर जमिनीच्या हद्द निश्चितीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित सोसायटीधारकांनी भूमी अभिलेख विभागाकडे तातडीने रीतसर अर्ज दाखल करावेत. हे अर्ज प्राप्त होताच संबंधित जागेची मोजणी व सर्वेक्षणाचे काम विलंब न लावता हाती घ्यावे, असे निर्देश गृह (शहरे) व महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.या प्रक्रियेत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील या जमिनीच्या हद्द निश्चितीबाबत तसेच संबंधित प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

RTI : पश्चिम मुंबईत दोन वर्षांत एकाही शाळेची तपासणी नाही? शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

हद्द निश्चितीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यावर भर

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील ८४८ एकर जमिनीच्या सीमांकनासंदर्भातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधित सोसायटीधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर विभागाने जागेची मोजणी आणि सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश राज्यमंत्री कदम यांनी दिले. या प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही त्यांनी सूचित केले.

स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन कार्यवाही करणार

हद्द निश्चितीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन राबविण्यात येणार आहे. संबंधित नागरिकांचे सहकार्य घेऊन आवश्यक प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यात येईल, असे यावेळी राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले.

बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, महसूल विभागाच्या सहसचिव मनीषा जायभाये, पोलीस उपायुक्त (उत्तर विभाग-३) गजानन राजमाने, उपवनसंरक्षक किरण पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी नागनाथ रोहिले नगरसेवक वैभव भरडकर, तसेच उज्वला भगत, आत्माराम चाचे, अरुण सुर्वे, सुरेश यादव, राजेश सावरकर, शरद वाघ, गोपाळ सुतार आणि संदीप मसूरकर यांच्यासह संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Accident News: ‘हेल्प… हेल्प…’च्या आर्त हाका! इम्पेरियल हाइट्सच्या आगीत दोन महिलांचा मृत्यू

Web Title: Sanjay gandhi national park 848 acres land demarcation yogesh kadam directs society holders pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • Borivali
  • Sanjay Gandhi National Park
  • Yogesh Kadam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.