Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar : ‘सरकारचं डोकं सटकलंय, भाजपसोबत जास्त काळ राहू नका!’ एकनाथ शिंदेंना रोहित पवारांचा अप्रत्यक्ष सल्ला

Rohit Pawar : भाजपसोबत सत्तेत राहणाऱ्यांचं नुकसान होणार, असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरतानाच एआय डेटा सेंटर आणि दुष्काळाच्या परिस्थितीवरही त्यांनी जोरदार टीका केली.

  • By विवेक
Updated On: Nov 08, 2026 | 03:59 PM
rohit pawar on eknath shinde

rohit pawar on eknath shinde

Follow Us
Follow Us:
  • भाजप सरकारवर रोहित पवारांचा जोरदार निशाणा
  • एकनाथ शिंदेंना भाजपपासून दूर राहण्याचा सल्ला
  • हिवाळी अधिवेशनापर्यंत कर्जमाफी करण्याचा इशारा
 

राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडीना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता रोच संघर्ष पाहायला मिळत आहे. अश्यातच राष्ट्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. (Rohit Pawar)

रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंना विनंती करत जास्त काळ भाजपसोबत राहू नका असा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीकादेखील केली. आधीच महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यात रोहित पवारांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे, राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एकनाथ शिंदेंना भाजपपासून दूर राहण्याचा सल्ला?

“भाजपसोबत सत्तेत राहणाऱ्या पक्षांचं राजकीय नुकसान होऊ शकतं,” असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं. एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे भाजपसोबत जास्त काळ राहू नका, अशी विनंतीही त्यांनी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटावरदेखील टोला लगावला. “आपल्या कुटुंबातील दुसऱ्या पक्षात नेमकं काय सुरू आहे, हे त्यांनाच माहीत नाही,” असं ते म्हणाले.

राष्ट्रवादीत खदखद नेमकी आहे तरी कसली? पक्षाचे नेतेमंडळी झाले सैरभैर

AI डेटा सेंटरवरून आमदारांना टोला

AI डेटा सेंटरच्या मुद्द्यावरूनही रोहित पवारांनी सरकारला लक्ष्य केलं. भाजपच्या काही कार्यकर्त्यांनाच AI डेटा सेंटरबद्दल माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला. 100 पवार आले तरीही डेटा सेंटर होईल, या वक्तव्याला उत्तर देताना ‘100 कशाला, एकटाच पवार तुम्हाला बस आहे,’ असा टोला त्यांनी लगावला. या प्रकल्पात स्थानिक आमदारांच्या निकटवर्तीयांची भागीदारी असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला धारेवर धरलं

राज्य सरकारची कर्जमाफी योजना नसून ती कर्जवसुली योजना असल्याची टीका रोहित पवारांनी केली. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण झालेली नाहीत, असं सांगत हिवाळी अधिवेशनापर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला.

मायक्रो फायनान्स कंपन्यांची वसुली किमान एक वर्ष थांबवावी आणि त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

1972 पेक्षाही यंदाचा दुष्काळ गंभीर?

यंदाची दुष्काळी परिस्थिती 1972 पेक्षाही वाईट असल्याचं रोहित पवार म्हणाले. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था पाहून मन हेलावून जात असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारने तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.

एकूणच शेतकरी प्रश्न, AI डेटा सेंटर आणि सत्ताधाऱ्यांच्या राजकारणावरून रोहित पवारांनी सरकारला चांगलंच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Gokul Politics : गोकुळवरून कोल्हापूर पेटलं! शासनाचा पुतळा जाळला, कोल्हापुरात दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर

💡

Frequently Asked Questions

  • Que: रोहित पवारांनी भाजप सरकारवर कोणती टीका केली?

    Ans: भाजपसोबत सत्तेत राहणाऱ्या पक्षांचं नुकसान होणार असल्याचं सांगत रोहित पवारांनी सरकारवर संविधान, शेतकरी प्रश्न आणि AI डेटा सेंटरच्या मुद्द्यावरून टीका केली.

  • Que: शेतकरी कर्जमाफीबाबत रोहित पवारांची काय मागणी आहे?

    Ans: हिवाळी अधिवेशनापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मायक्रो फायनान्स कंपन्यांची वसुली एक वर्ष थांबवण्याची मागणीही केली.

  • Que: रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंबाबत काय विधान केलं?

    Ans: एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जास्त काळ राहू नये, अशी अप्रत्यक्ष विनंती केल्याचं रोहित पवारांनी सांगितलं.

Web Title: Rohit pawar criticizes bjp govt and tell eknath shinde to leave mahayuti alliance vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • NCP Sharad Pawar
  • rohit pawar

संबंधित बातम्या

एकनाथ शिंदेंकडून तांड्यावरील नागरिकांना दिवाळीची भेट; स्वखर्चातून आनंदाचा शिधा वाटप
1

एकनाथ शिंदेंकडून तांड्यावरील नागरिकांना दिवाळीची भेट; स्वखर्चातून आनंदाचा शिधा वाटप

NCP Merger : सिल्व्हर ओकवर मोठ्या घडामोडी! जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुखांसह पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला, विलीनीकरण होणार?
2

NCP Merger : सिल्व्हर ओकवर मोठ्या घडामोडी! जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुखांसह पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला, विलीनीकरण होणार?

Devendra Fadnavis on Gokul milk: गोकुळ वादात फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट! ‘शिंदे-पवारांच्या संमतीनेच…
3

Devendra Fadnavis on Gokul milk: गोकुळ वादात फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट! ‘शिंदे-पवारांच्या संमतीनेच…

BDD Chawl Redevelopment : बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती; घरांचा दर्जा आणि सुविधांशी तडजोड नाही – एकनाथ शिंदे
4

BDD Chawl Redevelopment : बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती; घरांचा दर्जा आणि सुविधांशी तडजोड नाही – एकनाथ शिंदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.