Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena : “महिला शाखाप्रमुख मारहाण प्रकरणी उबाठा गटावर गुन्हे नोंदवा”, शीतल म्हात्रे यांचं निवेदन

नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा, असं निवेदन शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रेच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचे अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांच्याकडे करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 12, 2025 | 03:28 PM
"महिला शाखाप्रमुख मारहाण प्रकरणी उबाठा गटावर गुन्हे नोंदवा", शीतल म्हात्रे यांचं निवेदन (फोटो सौजन्य-X)

"महिला शाखाप्रमुख मारहाण प्रकरणी उबाठा गटावर गुन्हे नोंदवा", शीतल म्हात्रे यांचं निवेदन (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

मुंबई : नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरळी कोळीवाडा येथे शिवसेना माहिला शाखाप्रमुख पुजा बारीया यांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी उबाठा गटावर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक व विभागप्रमुख दत्ता नरवणकर, माजी नगरसेविका रत्ना महाले, प्रवक्त्या सुशीबेन शहा यांच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांची आज भेट घेतली. महिलेला मारहाण करणे ही गंभीर बाब असून या प्रकरणी अदखलपात्र तक्रार न घेता दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, असे निवेदन देशमाने यांना शिवसेनेकडून यावेळी देण्यात आले.

“जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा…”, जनसुरक्षा विधेयकाला विरोध, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ७८ ठिकाणी निदर्शने

वरळी कोळीवाडा येथे दरवर्षी नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी कोळीबांधवांच्या निमंत्रणाला मान देऊन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नारळी पौर्णिमेच्या उत्सवात सहभागी झाले होते, मात्र यावेळी उबाठाच्या गटाचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे तसेच कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कोणतेही कारण नसताना शिवसेना महिला शाखाप्रमुख पुजा बारिया यांना मारहाण केली.

या मारहाणीत जखमी झालेल्या पुजा यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीसांनी संबधितांवर गुन्हे दाखल करावेत, यासाठी आज शिवसेनेचे शिष्टमंडळ अप्पर पोलीस आयुक्त देशमाने यांना भेटले, अशी माहिती शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या की, वरळीतील उबाठाचे आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदे याने पुजा बारिया यांना मारहाण केली. जखमी पुजा बारिया या दोन दिवस केईएम रुग्णालयात उपचार घेत होत्या. या प्रकरणी पोलीसांनी अदखलपात्र तक्रार न घेता दोषींवर एफआयआर नोंदवावा, अशी मागणी म्हात्रे यांनी केली.

राज्यात रक्षा बंधनाचा उत्साह असताना उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांच्या डोळ्यांदेखत महिलांना मारहाण झाली. यावर आदित्य ठाकरे संबधित युवा सेना पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेणार का, असा सवाल म्हात्रे यांनी केला. एका महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या पदाधिकाऱ्याबाबत आदित्य ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी, असे त्या म्हणाल्या. महिलांचा मानसन्मान ठेवत असाल तर आदित्य ठाकरे यांनी तात्काळ सिद्धेश सुनील शिंदे याचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुशीबेन शहा यांनी केली.

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Web Title: Shiv sena sheetal mhatre submitted a memorandum to additional police commissioner vikram deshmane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
1

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
2

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
3

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
4

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.