Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच फूट पडणार?; आमदार-शहरप्रमुखांचे नाराजी नाट्य शिगेला

कल्याण लोकसभेत सर्वाधिक विकासकामे करूनही त्याठिकाणी खासदार श्रीकांत  शिंदे यांना अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नाही. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या वेळी दोन्ही गटातील मतभेद उफाळून आल्याने मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी रागाच्या भरात अंबरनाथ शहराची शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 19, 2024 | 02:13 PM
शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच फूट पडणार?; आमदार-शहरप्रमुखांचे नाराजी नाट्य शिगेला
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेने आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. वेगवेगळ्या जागांसाठी दावे प्रतिदावे करण्यास सुरूवात झाली आहे.पण हीच गोष्ट राजकीय पक्षांच्या प्रमुखांसाठी आता डोकेदुखी ठरु लागली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच म्हणजेच कल्याणमध्ये विधानसभेच्या निवडणुकी आधीच नाराजीच सूर उमटू लागला आहे. त्यामुळे या नाराजीचा शिंदेना फटका बसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  अंबरनाथ शहरातील शिवसेनेत आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर  या दोन गटातील मतभेद सर्वांच्याच परिचयाचे आहेत. लोकसभा निवडणुकीतील कामगिरी, अंतर्गत गटबाजीमुळे  अंबरनाथ शहरातील शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर स्वत: खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये नवीन कार्यकारणीच्या निवडीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. पण यावेळीही शहरातील दोन गट एका गट कार्यक्रमाला उपस्थित राहुल नाही. त्यामुळे शहरातील या दोन गटातील गटबाजी अजूनही कायम असल्याचे बोलले जात आहे.

 गेल्या 10-15 वर्षांपासून किणीकर विरूद्ध वाळेकर  संघर्ष?

अंबरनाथ शहरातील शिवसेनेत डॉ. बालाजी किणीकर आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यात  गेल्या 10 ते 15 वर्षांपासून शीतयुद्ध सुरू आहे. पण गेल्या पाच वर्षांमध्ये किणीकर आणि वाळेकर यांच्यातील वाद टोकाला गेल् आहेत. लोकसभा निवडणुकीतही  किणीकर यांच्य नेतृत्त्वाखाली संपूर्ण प्रचारयंत्रणा राबवण्यात आली . पण

गेल्या पाच वर्षांत किणीकर आणि  5 वर्षात तर या दोन गटातील शीतयुद्ध टोकाला गेलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण प्रचार यंत्रणा आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली. त्यातच कल्याणमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेच्या शहर शाखेच्या कार्यालयाऐवजी  बाजूच्याच नवीन कार्यालयातून निवडणूक प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे या दोन्ही गटांची नाराजी चांगलीच वाढली होती.

त्यातच कल्याण लोकसभेत सर्वाधिक विकासकामे करूनही त्याठिकाणी खासदार श्रीकांत  शिंदे यांना अपेक्षित मताधिक्य मिळू शकले नाही. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या वेळी दोन्ही गटातील मतभेद उफाळून आल्याने मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी रागाच्या भरात अंबरनाथ शहराची शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी अंबरनाथमध्ये नवीन कार्यकारणीत काम करण्यासाठी इच्छुकांच्या मुलखती घेतल्या. पण या मुलाखतींच्या कार्यक्रमालाही अरविंद वाळेकर यांच्यासह त्यांचा संपूर्ण गटाने पाठ फिरवली. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले प्रदीप पाटील हे देखील या कार्यक्रमाला गेले नाहीत.  त्यामुळे असेच चालत राहिल्यास पक्षातील गटबाजी कधी कमी होणार,असा  प्रश्न उपस्थित होत आहे.

 

Web Title: Shiv sena will split in the welfare of eknath shinde disputes between representatives of the people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2024 | 02:13 PM

Topics:  

  • shivsena
  • Shrikant Shinde
  • Vidhansabha Elelction 2024

संबंधित बातम्या

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?
1

Eknath Shinde: निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
2

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?
3

अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या, राष्ट्रवादीने पूर्ण श्रेय घेतले, शिंदेंची शिवसेना काय करणार?

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक
4

बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.