Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी नोकरीत समावेश करण्यात यावा; तृतीयपंथीयांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली दाखल

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 29, 2022 | 08:19 AM
सरकारी नोकरीत समावेश करण्यात यावा; तृतीयपंथीयांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली दाखल
Follow Us
Follow Us:

मुंबई :राज्यातील सरकारी नोकऱ्यामध्ये तृतीयपंथीयांचाही समावेश करा अशी मागणी करणारी जनहित याचिका संग्राम आणि मुस्कान या दोन सेवाभावी संस्थांनी अॅड. विजय हिरेमठ यांच्यामार्फत सोमवार रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर प्राथमिक सुनावणी दरम्यान या याचिकेची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग नोटीस बजावली आहे.

तृतीयपंथीय नोकरीपासून वंचित – महाराष्ट्र परिवहन आणि पोलीस खात्यातील नोकरीसाठी आवश्यक सर्व शैक्षणिक पात्रता आणि प्रशिक्षण असूनही राज्य सरकारने निव्वळ तृतीयपंथी असल्यामुळे नोकरीपासून वंचित ठेवले असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. तृतीयपंथीयांच्या समुदायाला रोजगार, शिक्षण, आरोग्यसेवा आणि नागरिकत्वासह सर्व कायदेशीर संरक्षण आणि त्याच्या मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीचा हक्क अनिवार्य असल्याचेही निकालात म्हटले आहे. इतर गोष्टींबरोबरच भारतीय राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार हे ट्रान्सजेंडर व्यक्तींनाही तितकेच लागू असल्याचेही अॅड. हिरेमठ यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची गंभीर दखल घेत खंडपीठाने राज्य सरकार आणि एमपीएससीला नोटीस बजावली आणि तीन आठवड्य़ात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. तसेच याचिकाकर्त्यांना महाराष्ट्र ट्रान्सजेंडर वेल्फेअर बोर्डला प्रतिवादी करण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.

सर्व नोकऱ्यांमध्ये समाविष्ठ करण्याची मागणी – सरकारी नोकरीसाठी अर्ज प्रक्रियेदरम्यान फक्त स्त्री आणि पुरुष अशा दोनच लिंगाचा जेंडर उल्लेख येतो. तिथे तृतीयपंथीयांचीही समावेश करण्यात यावा अशी प्रमुख मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच न्यायालयाने राज्य सरकारला तृतीयपंथींचा पर्याय राज्यातील सर्व सरकारी नोकऱ्यांच्या अर्जात समाविष्ट करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. सदर याचिकेवर काल सोमवारी रोजी न्या. अमजद सय्यद आणि न्या. अभय अहुजा यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. तृतीयपंथींयांना कायद्यांमध्ये आणि विशेष मागास प्रवर्गात परिभाषित केले आहे. तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांचा समावेश न केल्यामुळे त्यांच्या समुदायाच्या जीवन समानता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे. 2014 च्या नेलसा विरुद्ध केंद्र सरकार या निकालात सर्वोच्च न्यायालयाने संविधानात कलम 14 नुसार परिभाषित केलेल्या व्यक्ती शब्दाचा उल्लेख केला ज्यामध्ये नागरिकांना समानतेचा अधिकार दिला आहे. त्यात फक्त स्त्री अथवा पुरुष यांचा समावेश नसून हिजडा अथवा तृतीयपंथीयांचाही समावेश असल्याचेही अधोरेखित केल्याचे अॅड. हिरेमठ यांनी युक्तिवाद करताना स्पष्ट केले.

Web Title: Should be included in government jobs transgenders files petition in mumbai high court nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2022 | 08:17 AM

Topics:  

  • High court
  • Mumbai
  • Transgenders

संबंधित बातम्या

Kasturba Hospital Mumbai: रुग्णालयाच्या आवारात ‘नवरंगा’ची हजेरी; कस्तुरबात दुर्मिळ इंडियन पिट्टाचे दर्शन!
1

Kasturba Hospital Mumbai: रुग्णालयाच्या आवारात ‘नवरंगा’ची हजेरी; कस्तुरबात दुर्मिळ इंडियन पिट्टाचे दर्शन!

Air Pollution Mumbai : फटाक्यांच्या बॉक्सवरील माहितीच संशयास्पद! QR कोड बनावट, बंदी असलेल्या बेरियमचा वापर; आवाज फाउंडेशनचा इशारा
2

Air Pollution Mumbai : फटाक्यांच्या बॉक्सवरील माहितीच संशयास्पद! QR कोड बनावट, बंदी असलेल्या बेरियमचा वापर; आवाज फाउंडेशनचा इशारा

Mumbai Housing Project: मूळ मुंबईकरांना मुंबईतच हक्काची घरे मिळणार! बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना सदनिकांचे वाटप
3

Mumbai Housing Project: मूळ मुंबईकरांना मुंबईतच हक्काची घरे मिळणार! बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना सदनिकांचे वाटप

Maharashtra Politics: ‘तुझा बाप सरड्यासारखे रंग बदलतो’, थोरवेंच्या आक्रमक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
4

Maharashtra Politics: ‘तुझा बाप सरड्यासारखे रंग बदलतो’, थोरवेंच्या आक्रमक वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.