Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एसटी बँकेचे मुख्य कार्यालय म्हणजे गुंडागर्दीचा अड्डा; श्रीरंग बरगे यांचा आरोप

एसटी बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहार, फाईल गहाळ होण्याचे प्रकरण आणि बेकायदेशीर खरेदी यांसंदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकार आयुक्त कार्यालय, पुणे यांना पत्र पाठवले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 11, 2026 | 11:44 AM
एसटी बँकेचे मुख्य कार्यालय म्हणजे गुंडागर्दीचा अड्डा; श्रीरंग बरगे यांचा आरोप

एसटी बँकेचे मुख्य कार्यालय म्हणजे गुंडागर्दीचा अड्डा; श्रीरंग बरगे यांचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • एसटी बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहार
  • बँकेच्या अध्यक्षांनी कठोर भूमिका घ्यावी
  • नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींची माहिती
मुंबई : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेत कथित आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहारांच्या तक्रारींची चौकशी सुरू असतानाच, बँकेवरील वर्चस्व कायम राखण्यासाठी संचालक मंडळातील सदस्यांमध्ये परस्पर संघर्ष सुरू असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. बँकेचे मुख्य कार्यालय म्हणजे जणू गुंडागर्दीचा अड्डाच बनल्याची टीकाही त्यांनी केली.

एसटी बँकेतील कथित आर्थिक गैरव्यवहार, फाईल गहाळ होण्याचे प्रकरण आणि बेकायदेशीर खरेदी यांसंदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकार आयुक्त कार्यालय, पुणे यांना पत्र पाठवले होते. त्यानंतर या प्रकरणांच्या चौकशीसाठी प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर कथित गैरव्यवहारांवर पांघरूण घालण्यासाठी बँकेच्या संचालकांमध्ये परस्पर कुरघोडी सुरू असल्याचा आरोप बरगे यांनी केला आहे.

बँकेवरील वर्चस्वाच्या संघर्षातून नागपाडा पोलीस ठाण्यात काही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई सेंट्रल येथील वाहतूक भवनातील बँकेच्या मुख्य कार्यालयात चौकशीसाठी पोलिसांच्या फेऱ्या वाढल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी एका व्यक्तीने वस्तरा म्हणजेच धारदार शस्त्र घेऊन आल्याची घटना घडली होती. या घटनेची नोंद नागपाडा पोलीस ठाण्यात असल्याचे सांगण्यात येते. संबंधित व्यक्तीने एका संचालकाने आपल्याकडून लाखो रुपये घेतल्याचे पोलिसांना सांगितल्याचा दावाही बरगे यांनी केला. या सर्व प्रकारांमुळे बँकेचे कामकाज आणि प्रतिमा धोक्यात येत असून, बँकेला आर्थिक संकटात ढकलण्याची जणू स्पर्धाच सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

बँकेच्या अध्यक्षांनी कठोर भूमिका घ्यावी

एसटी महामंडळाचे मुंबई सेंट्रल येथील मुख्यालय आणि बँकेचे मुख्य कार्यालय एकाच इमारतीत असल्याने, बँकेतील कथित गैरप्रकार आणि संचालक मंडळाच्या बैठकीदरम्यान होणाऱ्या वादांचा परिणाम महामंडळाच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांवर होत असल्याचा दावा बरगे यांनी केला आहे. या घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

गेल्या दोन वर्षांत बँकेच्या कार्यालयात पोलिस किती वेळा आले, याची माहिती सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या नोंदी तपासून घ्यावी. तसेच, नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींची माहिती घेऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणी बरगे यांनी केली आहे.

बँकेचे अध्यक्ष तसेच एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घ्यावी. बँकेच्या कार्यालयामुळे महामंडळाच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना त्रास होत असल्याचे आढळल्यास, एसटीच्या मुख्यालयातील बँकेचे कार्यालय हटवून ते अन्यत्र हलविण्याची कारवाई करावी, अशी मागणीही श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

MSRTC Land Development : एसटी महामंडळाला मिळणार उत्पन्नाचा नवा स्रोत; पीपीपी तत्त्वावर जमिनींचा विकास करण्याचा निर्णय

Web Title: St bank headquarters is a den of hooliganism alleges of shrirang barge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Maharashtra ST Buses
  • Mumbai News
  • Shrirang Barge

संबंधित बातम्या

Mumbai News : मुंबईत ‘वंचित’ आक्रमक! हुतात्मा चौकात आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात
1

Mumbai News : मुंबईत ‘वंचित’ आक्रमक! हुतात्मा चौकात आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात

Mumbai News : मुंबईच्या ७ कोळीवाड्यांचे सीमांकन तीन महिन्यांत पूर्ण होणार; समिती गठीत, भूमिपुत्रांना मिळणार लवकरच न्याय
2

Mumbai News : मुंबईच्या ७ कोळीवाड्यांचे सीमांकन तीन महिन्यांत पूर्ण होणार; समिती गठीत, भूमिपुत्रांना मिळणार लवकरच न्याय

प्राचीन बाणगंगा तलावाने घेतला मोकळा श्वास! पालिकेने दिलेल्या कृत्रिम तळ्यांच्या पर्यायामुळे सर्वपित्री अमावस्या ठरली प्रदूषणमुक्त
3

प्राचीन बाणगंगा तलावाने घेतला मोकळा श्वास! पालिकेने दिलेल्या कृत्रिम तळ्यांच्या पर्यायामुळे सर्वपित्री अमावस्या ठरली प्रदूषणमुक्त

Mumbai News : NCLT च्या कामकाजात मुंबई खंडपीठ देशात अव्वल; ४,१८९ कोटींच्या ३५ योजनांना मंजुरी
4

Mumbai News : NCLT च्या कामकाजात मुंबई खंडपीठ देशात अव्वल; ४,१८९ कोटींच्या ३५ योजनांना मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.