Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News : NCLT च्या कामकाजात मुंबई खंडपीठ देशात अव्वल; ४,१८९ कोटींच्या ३५ योजनांना मंजुरी

एनसीएलटीच्या कामकाजात मुंबई खंडपीठाने देशात अव्वल स्थान मिळवत विक्रमी कामगिरी केली आहे. मात्र, सदस्यांची रिक्त पदे आणि पायाभूत सुविधांचा अभाव ही आव्हाने कायम आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 10, 2026 | 10:20 AM
Mumbai News : NCLT च्या कामकाजात मुंबई खंडपीठ देशात अव्वल; ४,१८९ कोटींच्या ३५ योजनांना मंजुरी

Mumbai News : NCLT च्या कामकाजात मुंबई खंडपीठ देशात अव्वल; ४,१८९ कोटींच्या ३५ योजनांना मंजुरी

Follow Us
Follow Us:
  • मुंबई खंडपीठाकडून ३५ ठराव योजनांना मंजुरी
  • देशभरात १०७ योजनांना मिळाला हिरवा कंदील
  • एनसीएलटीमधील १४ सदस्यांची पदे रिक्त
राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीत ४,१८९ कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या ३५ ठराव योजनांना मंजुरी देत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. देशभरातील सर्व खंडपीठांनी मिळून या तिमाहीत १०७योजनांना मंजुरी दिली असून, त्यांचे एकूण मूल्य ११,०७१.१७ कोटी रुपये आहे. न्यायाधिकरणाच्या स्थापनेपासून एका तिमाहीत मंजूर झालेल्या योजनांची ही सर्वाधिक संख्या आहे.

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा

एकूण मंजूर रकमेतील ३८ टक्के वाटा

एनसीएलटीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात मंजूर झालेल्या योजनांपैकी जवळपास एकतृतीयांश योजना मुंबई खंडपीठाने मंजूर केल्या, तर एकूण मंजूर रकमेतील सुमारे ३८ टक्के वाटा मुंबईचा आहे. मुंबईनंतर प्रधान आणि नवी दिल्ली खंडपीठाने २९ योजनांना मजुरी दिली. चंदीगड खंडपीठाने नऊ, तर अहमदाबाद खंडपीठाने आठ योजनांना मंजुरी दिली.

सहामाहीत १८५ योजनांना मंजुरी

  • चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीतील कामगिरी मागील वर्षांच्या तुलनेत लक्षणीय आहे. २०२५-२६ च्या याच तिमाहीत ६०, २०२४-२५ मध्ये ५७ आणि २०२३-२४ मध्ये ८२ योजनांना मंजुरी मिळाली होती.
  • चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ७८ योजनांना मंजुरी मिळाली होती. त्यामुळे पहिल्या सहामाहीतील मंजूर योजनांची संख्या १८५ झाली आहे. न
  • यायाधिकरणाच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकूण १,७३५ योजनाना मंजुरी मिळाली आहे.
मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर! पश्चिम रेल्वेवर ४ नवे प्लॅटफॉर्म अन् ३०-४० अतिरिक्त लोकल; गर्दीच्या त्रासातून सुटका

१४ सदस्यांची पदे रिक्त; सुप्रीम कोर्टाकडून दखल

वाढत्या कामकाजादरम्यान सदस्यांची कमतरता आणि पायाभूत सुविधांचा अभाव ही आव्हाने कायम आहेत. अध्यक्षांव्यतिरिक्त ६२ सदस्यांची मंजूर संख्या असताना सध्या ४८ सदस्य कार्यरत असून, १४ पदे रिक्त आहेत, चालू वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी चार सदस्य पदावरून निवृत्त होणार आहेत. सध्या १३ न्यायालयांचे कामकाज पूर्ण दिवस, तर १८ न्यायालयांचे अर्धा दिवस चालते. प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी जुन्या प्रकरणांना प्राधान्य, सुनावणीचे नियोजन आणि कामकाजावर नियमित देखरेख ठेवली जात आहे. एनसीएलटीमधील नियुक्त्या आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांची सर्वोच्च न्यायालयाने स्वत हुन दखल घेतली आहे, प्रादेशिक खंडपीठांमधील मूलभूत सुविधांचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्यात आले आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Nclt mumbai bench tops india 4189 crore resolution plans 35 schemes approved 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Business
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा
1

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा

Mumbai News : ‘देवसखा’मधून रंगणार भक्ती आणि देवाच्या नात्याचा सुरेल प्रवास, भक्ती, श्रद्धा, संगीताचा संगम
2

Mumbai News : ‘देवसखा’मधून रंगणार भक्ती आणि देवाच्या नात्याचा सुरेल प्रवास, भक्ती, श्रद्धा, संगीताचा संगम

Ahilyanagar News: केंद्रीय पथक थेट बांधावर; अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
3

Ahilyanagar News: केंद्रीय पथक थेट बांधावर; अहिल्यानगरच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

Sawantwadi : सावंतवाडी नगरपरिषदेत पाणीपुरवठा घोटाळ्यावरून राडा; शिंदे शिवसेनेचा सभात्याग
4

Sawantwadi : सावंतवाडी नगरपरिषदेत पाणीपुरवठा घोटाळ्यावरून राडा; शिंदे शिवसेनेचा सभात्याग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.