राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम
सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
या वर्षीच्या गणेशोत्सवाला, स्विगी मुंबईतील भक्तांना प्रसाद पोहोचवणार आहे
मुंबई: राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अनेक गणेश मंडळांनी सुंदर असे देखावे उभारले आहेत. भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे. त्यातच आता यंदाच्यागणेशोत्सवाला, स्विगी (स्विगी लिमिटेड, एनएसई: SWIGGY / बीएसई : 544285), भारताचे आघाडीचे ऑन-डिमांड सुविधा प्लॅटफॉर्म, यांनी मुंबईच्या जीएसबी सेवा मंडळ आणि पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसोबत भागीदारी करून शहरभर घरपोच प्रसाद वितरित करण्याची व्यवस्था केली आहे. 26 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीपासून आतापर्यंत 7000 हून अधिक प्रसाद बॉक्स वितरित केले गेले आहेत. भक्तांसाठी हे आयकॉनिक पंडाल्समधील प्रसाद 5 सप्टेंबरपर्यंत स्विगी अॅपद्वारे फक्त 1 रुपयापासून सोयीस्करपणे मागवता येईल.
याव्यतिरिक्त, भाग्यवान ग्राहकांना स्विगी अॅपवरील “मॅच द मोदक” खेळून प्रत्यक्षात त्या पूजनीय पंडालला भेट देण्यासाठी खास व्हीआयपी पास जिंकण्याची संधीही मिळेल.
या उपक्रमाबद्दल बोलताना, स्विगीचे चीफ बिझनेस ऑफिसर सिद्धार्थ भाकू म्हणाले, “गणेशोत्सव हा भक्ती, अन्न आणि एकोप्याचा सण आहे. देशातील काही अतिप्रसिद्ध पंडाल्समधील प्रसाद स्विगी अॅपवर उपलब्ध करून देत आम्ही भक्तांना जरी ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसले तरी त्यांच्या परंपरांशी जोडलेले राहणे अधिक सोपे करत आहोत. तसेच, आभासी आरतीसारख्या नाविन्यपूर्ण सुविधांमुळे आम्ही हा उत्सव प्रत्येकासाठी अधिक आनंददायी आणि सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
उत्सव साजरा करण्याची पद्धत आणखी एक पाऊल पुढे नेत, स्विगीने अॅपवर एक इंटरअॅक्टिव्ह सुविधा देखील सुरू केली आहे, जिथे वापरकर्ते स्वतःचा पंडाल डिझाईन करू शकतात, आभासी आरती करू शकतात आणि आपल्या गणेशोत्सव साजऱ्यामध्ये एक वैयक्तिक स्पर्श जोडू शकतात.
जसे लाखो भक्त गणरायाचे स्वागत करण्यासाठी एकत्र येतात, तसाच स्विगी परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा संगम घडवत आहे, ज्यामुळे उत्सवाचे क्षण अधिक अर्थपूर्ण आणि सोयीस्कर होत आहेत. स्विगीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (पुणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, सोलापूर, सातारा, कराड, बारामती, नाशिक, जळगाव, अहमदनगर), गुरुजी तालीम (पुणे) आणि मेकोसाबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (नागपूर) यांच्याशी देखील भागीदारी केली आहे, ज्यामुळे भक्तांना त्यांच्या आवडत्या पंडाल्समधून प्रसाद मिळू शकेल.