Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा अखेर संपन्न; तब्बल ३३ तासांनंतर बाप्पाला भावपूर्ण निरोप

रविवारी रात्री ८ वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या राजाचे विसर्जन तब्बल ३३ तासांनंतर सोमवारी झाले. समुद्रातील उंच लाटा आणि तांत्रिक अडचणींमुळे हा सोहळा नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकला नाही.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 07, 2025 | 09:40 PM
Lalbaugcha Raja Visarjan 2025 (Photo Credit- X)

Lalbaugcha Raja Visarjan 2025 (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

मुंबई: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदा इतिहासात पहिल्यांदाच मोठा विलंब झाला. रविवारी रात्री ८ वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या राजाचे विसर्जन तब्बल ३३ तासांनंतर सोमवारी झाले. समुद्रातील उंच लाटा आणि तांत्रिक अडचणींमुळे हा सोहळा नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकला नाही. मात्र, अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर राजाची भव्य मूर्ती तराफ्यावर यशस्वीरित्या चढवण्यात आली आणि अखेर विसर्जन पार पडले. या सोहळ्याच्या अंतिम क्षणी अनंत अंबानी यांनी उपस्थित राहून राजाची अखेरची आरती केली.

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. या विलंबामुळे निर्माण झालेली अडचण मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने दूर झाली.

Faith, devotion & discipline — Lalbaugcha Raja visarjan completed before the moon eclipse. Unstoppable energy of the karyakartas 🙏 Miracle moments that Mumbai will always remember. Lalbaugcha Raja cha Vijay Aso! 🌺”@LalbaugchaRaja pic.twitter.com/u8IijgL3dj — Jag (@JigarGogri3) September 7, 2025

मंडळाकडून दिलगिरी व्यक्त

मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी या परिस्थितीवर स्पष्टीकरण दिले. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “लालबागच्या राजाचे विसर्जन भरती आणि ओहोटी वर अवलंबून असते. आम्ही चौपाटीवर पोहोचण्यापूर्वीच भरती सुरू झाली होती. त्यामुळे, भरती ओसरण्याची वाट पाहणे आवश्यक होते.” सुधीर साळवी यांनी रात्री साडे दहा ते अकरा वाजता विसर्जन पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली. त्यांनी पुढे सांगितले की, “लालबागचा राजा करोडो भाविकांचे श्रद्धास्थान आहे, त्यामुळे कोणतीही घाई न करता योग्य वेळेची वाट पाहणे महत्त्वाचे होते. उशिरा झालेल्या विसर्जनामुळे आम्ही सर्व भाविकांची दिलगिरी व्यक्त करतो.” या विलंबामुळे मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल साळवी यांनी त्यांचे आभार मानले. माध्यमांनी केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अखेर, अथक परिश्रमांनंतर राजाचा निरोप समारंभ पूर्ण होत असल्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे देखील वाचा: मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!

विसर्जन वेळेत का झाले नाही?

दरवर्षीप्रमाणे, दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे सकाळी 8 वाजण्यापूर्वी लालबागचा राजाच्या मूर्तीचे खोल समुद्रात विसर्जन करण्याची तयारी सुरू होती. मात्र, रविवारी सकाळी आलेल्या समुद्रातील जोरदार भरतीमुळे आणि विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या नवीन तराफ्याच्या तांत्रिक अडचणींमुळे मूर्तीला तराफ्यावर चढवणे कठीण झाले. यामुळे, गेल्या आठ तासांपासून लालबागचा राजाची मूर्ती समुद्रातच होती.

Web Title: The immersion ceremony of the lalbaugcha raja is finally over an emotional farewell to bappa after 33 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 09:34 PM

Topics:  

  • Lalbaghcha Raja
  • Mumbai

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
1

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
2

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
3

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
4

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.