Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक

Ganeshotsav 2026: मुंबईतील गणेशोत्सव २०२६च्या नियोजनासाठी मंगळवारी, ११ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत BEST व मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या आणि सुरक्षेसह विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 04, 2026 | 06:00 PM
गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक

गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवाच्या तयारीला वेग
  • मंडळे, पोलीस, पालिका, BEST, मेट्रोसह विविध विभागांची संयुक्त बैठक
  • गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी समन्वय
 

Ganeshotsav 2026: मुंबईतील बहुचर्चित गणेशोत्सव २०२६च्या नियोजनाला आता वेग येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक मंगळवारी, ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. नाना चौक येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभाग कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही बैठक होणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी समन्वय

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे या काळात वाहतूक, गर्दीचे नियोजन, सुरक्षा, स्वच्छता आणि आपत्कालीन यंत्रणा यांच्यात प्रभावी समन्वय असणे आवश्यक आहे. गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद

१४ ते २५ सप्टेंबरदरम्यान गणेशोत्सव

यंदाचा गणेशोत्सव सोमवार, १४ सप्टेंबर ते शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे. या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेश मंडप, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विसर्जन मिरवणुका होणार आहेत. गणेशोत्सव मंडळांना आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन देणे, विविध विभागांमध्ये समन्वय साधणे आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने संयुक्त बैठक घेण्यात येत आहे.

कोणकोणते विभाग सहभागी होणार?

बैठकीला मुंबईतील गणपती मंडळे आणि समन्वय समितीचे प्रतिनिधी यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईतील नगरसेवक, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, मुंबई महापालिकेच्या डी विभागातील संबंधित अधिकारी
अग्निशमन दल, BEST, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, ग्राहक सेवा केंद्राचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

वाहतूक आणि सार्वजनिक सुविधांवर विशेष भर

गणेशोत्सव काळात मुंबईतील वाढणारी गर्दी लक्षात घेता BEST बसच्या फेऱ्या वाढवण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. त्याचबरोबर मुंबई मेट्रोच्या फेऱ्यांची संख्या आणि धावण्याची वेळ वाढवण्याच्या शक्यतेवरही चर्चा केली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी शहरातील विविध भागांमध्ये सार्वजनिक फिरती शौचालये उपलब्ध करून देण्याच्या नियोजनावरही चर्चा होईल.

स्वच्छता आणि समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा

गणेशमूर्ती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिक समुद्रकिनाऱ्यांवर येतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणे आणि समुद्रकिनाऱ्यांवरील स्वच्छता प्रभावीपणे राखण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा मुद्दाही बैठकीत मांडला जाणार आहे.

तसेच समुद्रात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी अधिक संख्येने जीवरक्षक/सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याबाबत चर्चा होणार आहे.

मंडप परवानग्या आणि वीजपुरवठ्याबाबत मार्गदर्शन

गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी आवश्यक परवानग्या, वीजपुरवठा आणि इतर प्रशासकीय बाबींमध्ये अडचणी येऊ नयेत, यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे.

दरम्यान, गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी बैठकीला उपस्थित राहून आपल्या सूचना, अडचणी आणि आवश्यक मार्गदर्शन प्रशासनासमोर मांडावे, असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

Mumbai Local: मुंबई लोकलला पुन्हा ब्रेक! मुलुंडमध्ये ओव्हरहेड वायरवर साहित्य पडून आग; १५ ते २० मिनिटांचा विलंब

Web Title: Ganeshotsav 2026 joint meeting mumbai ganesh mandals mangal prabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • Ganpati Festival
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai

संबंधित बातम्या

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व
1

Sakharchauth Ganpati: आगरी समाजाचा साखरचौथचा गणपती नेमका काय? जाणून घ्या भाद्रपदातील या खास परंपरेचे महत्त्व

Rajapur Ganesh Visarjan: ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन् बाप्पाचा जयघोष! राजापूरमध्ये ११ दिवसांच्या बाप्पाला उत्साहात निरोप
2

Rajapur Ganesh Visarjan: ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन् बाप्पाचा जयघोष! राजापूरमध्ये ११ दिवसांच्या बाप्पाला उत्साहात निरोप

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप
3

Konkan Ganpati Visarjan: ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या’; कोकणात बाप्पाला भक्तिमय निरोप

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.