Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव?

Ulhas River : उल्हास नदीच्या पाण्याचे रंग बदलू लागल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 27, 2026 | 04:47 PM
Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव?

Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव?

Follow Us
Follow Us:
  • बदलापूरकरांच्या पाण्यावर ‘गढूळ’; संकट
  • तहान भागवणारी उल्हास नदीच धोक्यात
  • प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी
लाखो नागरिकांची तहान भागवणाऱ्या उल्हास नदी (Ulhas River) चे पाणी अचानक मोठ्या प्रमाणात गढूळ झाले आहे. नदीतील वाढलेल्या गढूळपणामुळे बदलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असतानाच नदीत मातीचा भराव, राडारोडा किंवा औद्योगिक रसायने मिसळली जात आहेत का, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे. पाण्याच्या शुद्धतेबरोबरच आता नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

उल्हास नदीच्या पाण्यातील टर्बिडिटी अर्थात गढूळपणा वाढल्याने बदलापूर शहरातील पाणी उपसा आणि उपलब्ध पाण्याच्या प्रमाणावर परिणाम झाला असून पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जल व्यवस्थापन उपविभागाने नागरिकांना पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन केले आहे.

कारण अस्पष्ट

नदीचे पाणी अचानक एवढे गढूळ होण्यामागचे नेमके कारण काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शिरगाव एमआयडीसीसह विविध भागांतून नदीत रासायनिक सांडपाणी मिसळत असल्याचा तसेच नदी परिसरातील मातीचा भराव आणि राडारोड्यामुळे गढूळपणा वाढत असल्याचा आरोप केला जात आहे.

Karjat News : माले येथे शेतकऱ्यांच्या घरातून वासरू पळवले ,शेतकऱ्यांची पोलिसात तक्रार..

कठोर कारवाईची मागणी

संबंधित शासकीय यंत्रणांनी नदीच्या पाण्याचे तातडीने नमुने घेऊन वैज्ञानिक तपासणी करावी, प्रदूषणाचा स्रोत शोधावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असताना लोकप्रतिनिधी या गंभीर विषयावर मौन का आहेत, असा संतप्त सवालही बदलापूरकरांकडून उपस्थित केला जात आहे.

Nagpur News : दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे

Web Title: Ulhas river water colour change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • Badlapur
  • chemical
  • MIDC

संबंधित बातम्या

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान
1

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.