फोटो सौजन्य सोशल मीडिया
माले गावातील नीलिमा निलेश मोकल या स्वतः शेतीचा व्यवसाय सांभाळतात. त्यांच्या घराला लागून असलेल्या गोठ्यात पांढऱ्या रंगाचे ‘लक्ष्मी’ नावाचे वासरू बांधले होते. रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी वासराला चारा दिला आणि त्यानंतर त्या झोपण्यासाठी गेल्या. मात्र सकाळी सहा वाजता वासराला चारा देण्यासाठी गोठ्यात गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला. गोठ्यात बांधलेले वासरू तेथे नव्हते.
जागरूक मतदारांनो, SIR बाबत महत्त्वाची अपडेट, निवडणूक आयोगानं घेतलाय मोठा निर्णय
गोठ्यात पाहणी केली असता वासरू बांधलेली दोरी सोडलेली आढळली. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी गोठ्यातून वासरू पळवून नेले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला. मोकल कुटुंबीयांनी तसेच परिसरातील नागरिकांनी वासराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच शोध घेऊनही ‘लक्ष्मी’चा ठावठिकाणा लागला नाही.
मोठी बातमी ! दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा; परीक्षाशुल्क माफीचा शासन निर्णय जारी
वासरू सापडत नसल्याने अखेर मोकल यांनी कळंब येथील पोलीस चौकीत जाऊन तक्रार दाखल केली. नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब आऊट पोस्टमधील पोलीस हवालदार महेश गोरे आणि काळोखे हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. वासरू चोरीला गेल्याने शेतीवर अवलंबून असलेल्या महिला शेतकरी आर्थिक संकटात सापडल्या असून, पोलिसांकडून वासराचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Nagpur News : जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित






