Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Tourism: पवई तलावावर साकारणार देशातील भव्य म्युझिकल फाउंटन; ४० मीटर उंच उसळणार पाण्याचे कारंजे, मराठ्यांचा इतिहासही उलगडणार

Mumbai Tourism: मुंबईच्या पवई तलावावर ३० कोटी रुपये खर्चून १८० मीटर लांबीचा अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन उभारण्यात आला आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी ७ वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 21, 2026 | 04:21 PM
पवई तलावावर साकारणार देशातील भव्य म्युझिकल फाउंटन; ४० मीटर उंच उसळणार पाण्याचे कारंजे, मराठ्यांचा इतिहासही उलगडणार!

पवई तलावावर साकारणार देशातील भव्य म्युझिकल फाउंटन; ४० मीटर उंच उसळणार पाण्याचे कारंजे, मराठ्यांचा इतिहासही उलगडणार!

Follow Us
Follow Us:
  • मुंबईकरांसाठी पर्यटनाची नवी पर्वणी!
  • पवई तलावावर ३० कोटींचा म्युझिकल फाउंटन
  • रविवारी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन
 

Mumbai Tourism: मुंबईच्या पर्यटन वैभवात आणखी एका आकर्षणाची भर पडणार आहे. पवई तलावाच्या सौंदर्यात भर घालणारा अत्याधुनिक म्युझिकल फाउंटन आणि लाईट अँड साउंड शो पर्यटकांसाठी सज्ज झाला आहे. सुमारे ३० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा १८० मीटर लांबीचा म्युझिकल फाउंटन मुंबईकरांसह पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. विशेष म्हणजे, या शोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आणि मराठ्यांच्या शौर्यगाथा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सादर केल्या जाणार आहेत.(Mumbai Tourism)

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन

पवई तलाव येथील गणेश घाट परिसरात या ‘लाईट, साउंड आणि संगीतमय कारंजे शो’चा उद्घाटन सोहळा रविवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मुंबई उपनगर जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झाला. म्हाडाच्या माध्यमातून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.

Mumbai Politics: मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारचा ७० हजार कोटींचा ‘पाताळ लोक’ मेगा प्लॅन

४० मीटर उंचीपर्यंत झेपावणार पाण्याचे कारंजे

या म्युझिकल फाउंटनमध्ये अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तब्बल ४० मीटर म्हणजेच १३० फूट उंचीपर्यंत पाण्याचे जेट्स झेपावणार आहेत. तसेच २७ फायर जेट्स या शोचे प्रमुख आकर्षण असतील. रनिंग फाउंटन चेसर्स, थ्रीडी स्विंग नॉझल्स आणि फॅन जेट्सच्या माध्यमातून पाण्याच्या विविध आकर्षक रचना साकारल्या जाणार आहेत. संगीताच्या तालावर नृत्य करणारे पाण्याचे कारंजे, आगीच्या ज्वाळा, वॉटर स्क्रीनवरील प्रोजेक्शन आणि लेझर प्रतिमा यांचा अनोखा संगम पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

मराठ्यांचा इतिहास आणि मुंबईची गौरवगाथा

या प्रकल्पांतर्गत जागतिक दर्जाचा मल्टिमीडिया लाईट अँड साउंड शो सादर केला जाणार आहे. यामध्ये तीन वेगवेगळे चित्रपट दाखवले जातील. छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आणि मराठ्यांचा पराक्रम, महाराष्ट्राची संस्कृती व वैभव तसेच मुंबईची गौरवशाली कहाणी अशा तीन विषयांवर आधारित सादरीकरण करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

दररोज तीन शोचे नियोजन

पर्यटकांसाठी दररोज सुमारे तीन तासांच्या कालावधीत तीन शो आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शोच्या संचालनासाठी स्वतंत्र कंट्रोल रूम, प्रशिक्षित कर्मचारी, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन उपकरणे, सुरक्षा रक्षक आणि प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय अखंड वीजपुरवठ्यासाठी डीजी सेट, प्लास्टिक खुर्च्या आणि व्हीलचेअर यांसारख्या सुविधांचाही समावेश आहे. प्रकल्पाच्या निविदेत तीन वर्षांच्या सर्वसमावेशक देखभाल व दुरुस्तीची तरतूद असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांच्या संचालनाचीही तरतूद करण्यात आली आहे.

तलावाच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा होण्याची अपेक्षा

या म्युझिकल फाउंटनमुळे केवळ पर्यटनालाच चालना मिळणार नाही, तर तलावातील पाण्याच्या एरेशन प्रक्रियेलाही मदत होणार आहे. दररोज सुमारे ३० लाख लिटर पाण्यात हवा मिसळण्याची प्रक्रिया होईल. त्यामुळे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते. याशिवाय बाष्पीभवनामुळे परिसरात थंडावा निर्माण होणे आणि हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होणे असे संभाव्य पर्यावरणीय फायदे अपेक्षित आहेत.

जलचरांच्या सुरक्षेचीही काळजी

पवई तलावातील जलचरांना कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. फाउंटनमध्ये केवळ एलईडी दिव्यांचा वापर केला जाणार असून, प्रकाश पाण्याच्या पृष्ठभागावरून वरच्या दिशेने दिला जाणार आहे. तसेच ध्वनीची तीव्रता निर्धारित डेसिबल मर्यादेत ठेवली जाणार आहे. या प्रकल्पामुळे पवई तलाव मुंबईतील पर्यटनाचे नवे आकर्षण बनण्याची अपेक्षा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि मुंबईचे वैभव एका आधुनिक दृक्-श्राव्य अनुभवातून पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.

Shrikant Shinde: ७५ हजार खेळाडू, ३२ खेळ आणि ऑलिम्पिकचा ध्यास; ठाण्यात खासदार क्रीडा संग्राम’चे उद्घाटन

💡

Frequently Asked Questions

  • Que: पवई तलावावरील म्युझिकल फाउंटन प्रकल्पासाठी किती खर्च करण्यात आला आहे?

    Ans: पवई तलावावरील म्युझिकल फाउंटन प्रकल्पासाठी सुमारे ३० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.

  • Que: पवई तलावावरील म्युझिकल फाउंटनचे उद्घाटन कधी आणि कोणाच्या हस्ते होणार आहे?

    Ans: रविवारी सायंकाळी ७ वाजता कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या म्युझिकल फाउंटनचे उद्घाटन होणार आहे.

  • Que: म्युझिकल फाउंटन शोमध्ये काय पाहायला मिळणार आहे?

    Ans: या शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मराठ्यांचा पराक्रम, महाराष्ट्राची संस्कृती आणि मुंबईची गौरवगाथा म्युझिकल फाउंटन, वॉटर स्क्रीन, लेझर प्रोजेक्शन आणि फायर जेट्सच्या माध्यमातून सादर केली जाणार आहे.

Web Title: Powai lake mumbai grand musical fountain light and sound show maratha history sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Mumbai
  • tourism

संबंधित बातम्या

Marathi Theatre: मराठी नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी! नेहरू सेंटरमध्ये ‘ही दोस्ती तुटायची नाही’पासून नाटकांची मेजवानी
1

Marathi Theatre: मराठी नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी! नेहरू सेंटरमध्ये ‘ही दोस्ती तुटायची नाही’पासून नाटकांची मेजवानी

FICCI Executive Committee: राष्ट्रीय उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा; रवींद्र माणगावे यांची FICCI कार्यकारी समितीवर निवड
2

FICCI Executive Committee: राष्ट्रीय उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा; रवींद्र माणगावे यांची FICCI कार्यकारी समितीवर निवड

Maharashtra Metro Stations Renaming: राज्यातील मेट्रो स्थानकांचे होणार नामांतर, राज्य सरकारकडून विशेष समिती स्थापन
3

Maharashtra Metro Stations Renaming: राज्यातील मेट्रो स्थानकांचे होणार नामांतर, राज्य सरकारकडून विशेष समिती स्थापन

Mumbai Local: लोकलमधील विचित्र प्रकार समोर! गोरेगाव स्थानकात महिला मोटरमन केबिनच्या दरवाज्यावर उभी राहिली अन्… Video Viral
4

Mumbai Local: लोकलमधील विचित्र प्रकार समोर! गोरेगाव स्थानकात महिला मोटरमन केबिनच्या दरवाज्यावर उभी राहिली अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.