Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Book Festival: मुंबईकरांसाठी पुस्तकांची मेजवानी! २४ नोव्हेंबरपासून मुंबई पुस्तक महोत्सव; २०० प्रकाशक, ६०० हून अधिक स्टॉल

Mumbai Book Festival 2026: मुंबईकरांसाठी पुस्तकांची मोठी पर्वणी आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत यांच्या वतीने २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरात मुंबई पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 21, 2026 | 05:52 PM
मुंबईकरांसाठी पुस्तकांची मेजवानी! २४ नोव्हेंबरपासून मुंबई पुस्तक महोत्सव; २०० प्रकाशक, ६०० हून अधिक स्टॉल

मुंबईकरांसाठी पुस्तकांची मेजवानी! २४ नोव्हेंबरपासून मुंबई पुस्तक महोत्सव; २०० प्रकाशक, ६०० हून अधिक स्टॉल

Follow Us
Follow Us:
  • मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरात रंगणार पुस्तकांचा महाकुंभ
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
  • लेखक, साहित्यिक अन् पुस्तकप्रेमींचा एकाच छताखाली मेळा!
मुंबई : पुस्तकप्रेमी, विद्यार्थी आणि साहित्यिकांसाठी मुंबईत मोठ्या पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत (NBT-India) यांच्या वतीने २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मुंबई पुस्तक महोत्सव २०२६ आयोजित करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील प्रवेशद्वार क्रमांक २ जवळ हा सहा दिवसीय महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवात २०० प्रकाशकांचे ६०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल असणार असून, नामवंत लेखक, साहित्यिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. विशेष म्हणजे, या महोत्सवासाठी नागरिकांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे. (Mumbai Book Festival 2026)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबई पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. महोत्सवाची घोषणा आयोजनस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी मुख्य आयोजक अमित साटम, मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक आणि मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे उपस्थित होते.

Mumbai Tourism: पवई तलावावर साकारणार देशातील भव्य म्युझिकल फाउंटन; ४० मीटर उंच उसळणार पाण्याचे कारंजे, मराठ्यांचा इतिहासही उलगडणार

२०० प्रकाशकांचे ६०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल

या महोत्सवात विविध भाषा आणि साहित्यप्रकारांतील पुस्तकांचा मोठा संग्रह वाचकांसाठी उपलब्ध असणार आहे. देशभरातील सुमारे २०० प्रकाशक सहभागी होणार असून, ६०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. कथा, कादंबऱ्या, कविता, इतिहास, चरित्र, विज्ञान, शिक्षण, स्पर्धा परीक्षा, बालसाहित्य आणि अन्य विषयांवरील पुस्तकांचा आनंद पुस्तकप्रेमींना घेता येणार आहे. सहा दिवसांत १०० हून अधिक कार्यक्रम आणि सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

नामवंत लेखक आणि मान्यवरांची उपस्थिती

या पुस्तक महोत्सवात साहित्य, कला, क्रीडा, चित्रपट, कायदा आणि अन्य क्षेत्रांतील अनेक नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत. यामध्ये दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंह संधू, आचार्य प्रशांत, पॅरालिम्पिक खेळाडू दीपा मलिक, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, गीतकार मनोज मुंतशिर, चित्रपट दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी, अभिनेत्री व लेखिका शेफाली शाह आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा समावेश आहे. याशिवाय अरुणा ढेरे, विश्वास पाटील, शरणकुमार लिंबाळे, अश्विन सांघी, आनंद नीलकंठन, अक्षत गुप्ता, अंजुम चोप्रा, अंशुल चतुर्वेदी, निकिता ठाकूर आणि प्रफुल्ल बिल्लौरे यांच्यासह अनेक मान्यवर वक्ते उपस्थित राहणार आहेत.

‘वंदे मातरम्’ आणि सरदार पटेल यांच्यावर विशेष प्रदर्शने

या महोत्सवात केवळ पुस्तकांची विक्री आणि प्रदर्शन एवढेच मर्यादित स्वरूप नसणार आहे. भारताच्या इतिहासाशी संबंधित विशेष प्रदर्शनांचेही आयोजन करण्यात येणार आहे. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या १५० वर्षांच्या गौरवशाली प्रवासावर विशेष प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विशेष प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.

बालकांसाठी विशेष उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम

लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी महोत्सवात विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. दररोज सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत बालकांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत लेखक मंचावर साहित्यिक संवाद, लेखकांशी थेट चर्चा आणि पुस्तक प्रकाशन सोहळे पार पडणार आहेत. तर सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.

मुंबईकरांसाठी प्रवेश विनामूल्य

मुंबई पुस्तक महोत्सवासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक, पुस्तकप्रेमी, लेखक, साहित्यिक आणि सर्वसामान्य नागरिकांना या महोत्सवात विनामूल्य सहभागी होता येणार आहे. मुंबईतील वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, नव्या पिढीला पुस्तकांशी जोडणे आणि भारताच्या बहुभाषिक साहित्यिक परंपरेचा परिचय करून देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. महोत्सवाबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांना www.mumbaibookfestival.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल.

Mumbai Politics: मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारचा ७० हजार कोटींचा ‘पाताळ लोक’ मेगा प्लॅन

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबई पुस्तक महोत्सव २०२६ कधी आयोजित करण्यात येणार आहे?

    Ans: मुंबई पुस्तक महोत्सव २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

  • Que: मुंबई पुस्तक महोत्सवाचे आयोजन कुठे करण्यात येणार आहे?

    Ans: मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील प्रवेशद्वार क्रमांक २ जवळ या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

  • Que: मुंबई पुस्तक महोत्सवासाठी प्रवेश शुल्क किती आहे?

    Ans: या सहा दिवसीय पुस्तक महोत्सवासाठी नागरिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे.

Web Title: Mumbai book festival 2026 mumbai university kalina november 24 29 sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Tourism: पवई तलावावर साकारणार देशातील भव्य म्युझिकल फाउंटन; ४० मीटर उंच उसळणार पाण्याचे कारंजे, मराठ्यांचा इतिहासही उलगडणार
1

Mumbai Tourism: पवई तलावावर साकारणार देशातील भव्य म्युझिकल फाउंटन; ४० मीटर उंच उसळणार पाण्याचे कारंजे, मराठ्यांचा इतिहासही उलगडणार

Mumbai Politics: मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारचा ७० हजार कोटींचा ‘पाताळ लोक’ मेगा प्लॅन
2

Mumbai Politics: मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारचा ७० हजार कोटींचा ‘पाताळ लोक’ मेगा प्लॅन

Marathi Theatre: मराठी नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी! नेहरू सेंटरमध्ये ‘ही दोस्ती तुटायची नाही’पासून नाटकांची मेजवानी
3

Marathi Theatre: मराठी नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी! नेहरू सेंटरमध्ये ‘ही दोस्ती तुटायची नाही’पासून नाटकांची मेजवानी

FICCI Executive Committee: राष्ट्रीय उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा; रवींद्र माणगावे यांची FICCI कार्यकारी समितीवर निवड
4

FICCI Executive Committee: राष्ट्रीय उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राचा ठसा; रवींद्र माणगावे यांची FICCI कार्यकारी समितीवर निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.