खाजगीकरण आणि कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ सोमवारपासून (28 मार्च) अनेक संघटनांनी राज्यात संप पुकारला आहे. या संपामध्ये बँक कर्मचाऱ्यांसोबत महावितरण कर्मचारी देखील सामील झाले आहेत. मात्र महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील अनेक भागांना त्याचा फटका सहन करावा लागला. मागण्या मान्य न झाल्यामुळे संपकरी संपाच्या निर्णायावर
ठाम आहेत. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांचा हा संप आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेे पुढच्या 2 ते 3 दिवसांत महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
[blurb content=””] अशातच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी ऊर्जामंत्र्यांसोबत मुंबईत काल बैठक झाली. पण ती बैठक निष्फळ ठरली आहे. शिवाय आज (मंगळवारी) ऊर्जामंत्र्यांसोबत होणारी बैठकही रद्द करण्यात आली आहे. वीज निर्मिती आणि कोळसा पुरवठा करणाऱ्या अनेक केंद्रांवरच्या संघटनांनी संप पुकारल्यानं विजेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोयना धरणाचं पायथा विद्युतगृह बंद पडलं आहे. त्यामुळं संपावर तोडगा न निघाल्यास वीजटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
[read_also content=”स्वप्नील जोशी- श्रेयश तळपदेचा मराठी टिव्हीविश्वात बोलबाला; ठरले सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते, मिळतो इतका perday https://www.navarashtra.com/movies/swapnil-joshi-and-shreyas-talpade-becoms-highest-paid-actors-in-marathi-tv-industry-nrak-261169.html”]