Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

Munawale Aqua Tourism Satara: सातारा जिल्ह्यातील मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 02, 2026 | 07:08 PM
मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
Follow Us
Follow Us:
  • मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी
  • किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
  • वाता सविस्तर बातमी!
मुंबई, दि. १ जुलै : मुनावळे जलपर्यटन प्रकल्प हा राज्याच्या पर्यटन विकासासाठी तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीही अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

आज विधानभवनात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत जलपर्यटन प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. राज्यातील जलपर्यटनाला नवी चालना देणे हा प्रमुख उद्देश आहे. तसेच सातारा जिल्हा राज्यातील महत्त्वाचे जलपर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्यास मदत होणार आहे.

मुनावळे (शिवसागर जलाशय) परिसराचा जागतिक दर्जाचे जलपर्यटन केंद्र (Aqua Tourism Hub) म्हणून विकास करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या भागातील समृद्ध नैसर्गिक संपदा आणि उपलब्ध जलसाठ्यामुळे पर्यटन विकासाला मोठी संधी उपलब्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पाचा आराखडा, प्रस्तावित मंजुरी, आवश्यक पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकास आराखड्याचा बैठकीत आढावा घेण्यात आला. प्रकल्पासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय मान्यता आणि विविध विभागांच्या परवानग्या निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना देसाई यांनी दिल्या. तसेच प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर वेळेचे नियोजन आणि विभागांमधील समन्वय राखण्यावर त्यांनी भर दिला.

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा

कोयना जलाशय परिसरात जागतिक दर्जाच्या जलपर्यटन सुविधा उभारण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या अंतर्गत नौकाविहार, जलक्रीडा, पर्यटक सुविधा केंद्र आणि अन्य पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार हा निधी सुमारे ९२ कोटींपेक्षा अधिक करण्यात आला आहे. विविध विभागांच्या आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

याच बैठकीत किल्ले प्रतापगडावरील पर्यटन विकासाचाही आढावा घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह भव्य स्मारक उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. स्मारकासाठी आवश्यक जागा निश्चित करून प्रस्ताव तातडीने अंतिम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

बैठकीला पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे(भा.प्र.से) पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी (भा.प्र.से), पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे आणि उपसचिव विजय पोवार उपस्थित होते. सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, वन विभाग, जलसंपदा विभाग आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. सर्व विभागांनी समन्वयाने कार्यवाही करून दोन्ही प्रकल्पांची अंमलबजावणी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

Satara Politics: सातारा क्लब-फोरम प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी; महसूल मंत्र्यांचे आदेश

Web Title: Munawale aqua tourism project satara 92 crore sanctioned veer jivaji mahale monument pratapgad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Satara News
  • Shambhraj Desai
  • Shivendrasinhraje Bhosale

संबंधित बातम्या

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
1

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचं राजकारण तापणार; रामराजे, शिवेंद्रसिंहराजे अन् मकरंद पाटलांची खलबते
2

Satara District Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचं राजकारण तापणार; रामराजे, शिवेंद्रसिंहराजे अन् मकरंद पाटलांची खलबते

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
3

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
4

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.