Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्द्यावर झाली चर्चा

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 08, 2025 | 01:18 PM
मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट; 'या' महत्वाच्या मुद्द्यावर झाली चर्चा

मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट; 'या' महत्वाच्या मुद्द्यावर झाली चर्चा

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ
  • मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
  • महत्वाच्या मुद्द्यावर झाली चर्चा

पुणे : ‘वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहराच्या नावाला काळीमा लागत आहे. काही जण गुन्हेगारी घटनांशी भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचा अपप्रचार करत आहेत. राजकीय हेतूने प्रेरित आरोप करुन कृपा करून शहराचे नाव बदनाम करू नका. भाजप गुंडांना पाठिंबा देणारा पक्ष नाही’, असे स्प्षट मत राज्याचे तंत्र व शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ‘चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांचे नाव वापरुन कोणी पोलिसांवर दबाब टाकत असतील, तर त्यांची गय करु नका. कोणत्याही परिस्थितीत पुण्यातील गुन्हेगारीचा बिमोड करावा’, असे आदेश पाटील यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले.

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. नंतर पोलीस आयुक्तालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
’कोथरूडमधील गुंड नीलेश घायवळ प्रकरणात चंद्रकांत पाटील, तसेच जैन बोर्डिंग प्रकरणात आमचे नाव जोडून काही जण त्यांची राजकीय फायदा उचलत आहेत. कोणतेही पुरावे नसताना थेट आरोप करणे चुकीचे आहे”, असे पाटील यांनी नमूद केले.

पाटील म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष गुन्हेगारी किंवा गुंडांना पाठिंबा देणारा पक्ष नाही. एका विचारधारेतून पक्षाचे सर्व कार्यकर्ते काम करतात. मात्र, कोथरूड गोळीबार प्रकरण, घायवळ परदेशात पसार होणे, त्याला मिळालेले पारपत्र अशा घटनांसाठी आमचा संबंध जोडून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणतेही पुरावे नसताना काही जण आरोप करत आहेत. जैन बोडिंग प्रकरणात मुरलीधर मोहोळ यांचे नाव जोडण्यात आले. पुणे शहराचा विस्तार वाढत आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. अशा परिस्थितीत शहराच्या विकासावर चर्चा न करता. केवळ आरोप करुन बदनामीचे प्रकार सुरू आहेत. अशा प्रकारांमुळे पुण्याचे नाव बदनाम होत आहे. अशा प्रकारांमुळे शहराच्या विकासावर परिणाम होत आहे.’

प्रकरणावर बोलणे टाळले..!

पार्थ पवार यांच्या अमोडिया होल्डिंग्ज कंपनीकडून झालेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाबाबत पत्रकारांनी पाटील आणि मोहोळ यांना प्रश्न केला. तेव्हा शहरातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांशी चर्चा केली, असे त्यांनी सांगून पाटील यांनी पार्थ पवार प्रकरणावर भाष्य करणे टाळले.

गुंडांची बेनामी संपत्ती जप्त करा

‘गुंड टोळ्यांना आर्थिक रसद कशी पुरविली जाते. त्यांना कशा प्रकारे पैसे मिळतात. गुंडांनी केलेले बेकायदा गैरव्यवहार प्रकरणात सक्त वसुली संचालनालय (ईडी), प्राप्तीकर विभागाकडून चोकशी करण्यात यावी. त्यांच्या बेनामी मालमत्ता जप्त करण्यात याव्यात, याबाबत पोलिसांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन उपाययोजना कराव्यात’, असे आदेश पाटील यांनी दिले आहेत.

Web Title: Muralidhar mohol chandrakant patil met and discussed with pune police commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • CM Devedra Fadnavis
  • murlidhar mohol
  • pune news

संबंधित बातम्या

काँग्रेस नेत्याच्या बंगल्यातून चोरी; पत्नीला चाकूचा धाक दाखवला अन्…
1

काँग्रेस नेत्याच्या बंगल्यातून चोरी; पत्नीला चाकूचा धाक दाखवला अन्…

पुणे, मुंबईतील सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा अन्…; हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी
2

पुणे, मुंबईतील सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा अन्…; हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी

तासगावात भाजप स्वबळावर मैदानात उतरण्यासाठी सज्ज; संजय पाटील गटाला आव्हान
3

तासगावात भाजप स्वबळावर मैदानात उतरण्यासाठी सज्ज; संजय पाटील गटाला आव्हान

MCA ने उचलले मोठे पाऊल! मुंबईत महिला क्रिकेट अकादमीसाठी घेतला ‘हा’ निर्णय; मुख्यमंत्री फडणवीस यांना घातली गळ 
4

MCA ने उचलले मोठे पाऊल! मुंबईत महिला क्रिकेट अकादमीसाठी घेतला ‘हा’ निर्णय; मुख्यमंत्री फडणवीस यांना घातली गळ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.