Lok Sabha Election 2024 : “पुणेकर विकासाला मतदान करतील, त्यामुळे भाजपला मतदान होणार हेदेखील निश्चित असणार आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लोकांना मतदान मागणार. पुण्यात केलेल्या सर्व कामांना म्हणजेच मेट्रो प्रकल्प असेल, रोडचे काम असेल, अशा सर्व कामांना पुणेकर निश्चित न्याय देतील, मी बाहेर जातो तेव्हा लोकं मला स्वतःहून सांगतात, निवडणूक एकतर्फी होणार आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, ही निवडणूक निश्चितपणे एकतर्फी होऊन निकाल 4 जूनला आमच्याकडून असेल”, असा ठाम विश्वास पुण्याचे भाजपचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. भाजपची लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज नवभारत/नवराष्ट्र कार्यालयाला भेट दिली.
लोकसभा एकतर्फी जिंकू
लोकसभेचे बिगूल वाजल्यानंतर आता प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आचारसंहिता जाहीर झाली आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची यादीसुद्धा जाहीर झाली आहे. त्यानंतर आता आचारसंहिता जाहीर झाली आहे. त्यानंतर भाजपचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आम्ही लोकसभा एकतर्फी जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर आम्ही केलेली कामे ही नक्कीच पुणेकरांना आवडली आहेत. त्यामुळे पुणेकर निश्चितच विकासाला मतदान करतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ देणार
आम्ही निवडून आल्यानंतर प्रथम पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण करणार असा विकासाचा पहिला रोडमॅप ठरणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पुण्यातील नदी प्रदूषणावरील प्रकल्पावर आमचे काम चालू आहे. ते निश्चितच लवकर पूर्ण होईल आणि परदेशातील नदीप्रमाणे पुण्यातील नदीचे स्वरूप असेल असा विश्वास व्यक्त केला.
Web Title: Muralidhar mohol firmly believes they said punekar will vote for bjp for vikas this lok sabha election 2024 will be one sided nryb