Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जमीन नावावर करण्यासाठी महिलेचा खून ; सहा तासात आरोपी गजाआड

पाच एकर जमीन नावावर करण्यासाठी अंगठा न दिल्याच्या कारणावरून शाकूबाई मारुती कोकरे (वय ४७) या महिलेस चाकूने भोकसून खून केल्याची घटना नंदेश्‍वर येथे रविवारी ( दि. २३) मध्यरात्री साडेबारा वाजता घडली.

  • By Aparna
Updated On: Oct 24, 2022 | 04:28 PM
जमीन नावावर करण्यासाठी महिलेचा खून ; सहा तासात आरोपी गजाआड
Follow Us
Follow Us:

मंगळवेढा :  पाच एकर जमीन नावावर करण्यासाठी अंगठा न दिल्याच्या कारणावरून शाकूबाई मारुती कोकरे (वय ४७) या महिलेस  चाकूने भोकसून खून केल्याची घटना नंदेश्‍वर येथे रविवारी ( दि. २३) मध्यरात्री साडेबारा वाजता   घडली.  या प्रकरणी मंगळवेढा पोलिसानी युद्धपातळीवर तपास करून अवघ्या सहा तासात  आरोपीला जेरबंद केले.

दादा उर्फ राजाराम बाबूराव शेजाळ, असे या आरोपीचे नाव आहे. त्याने गुन्हा कबूल केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेत दरोडेखोरांनी खून केल्याचा बनाव  करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत या खूनाचा छडा लावला.

शाकूबाई कोकरे हिचा गळयावर चाकूने वार करून  अज्ञात दरोडेखोरांनी खून केल्याची माहिती मंगळवेढयाच्या डीवायएसपी राजश्री पाटील व पोलिस निरिक्षक रणजित माने यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी  कोकरे हिच्या  गळयावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याचे व तिथे रक्ताने माखलेले अंथरून, कपडे आणि धारदार चाकू आढळून आला.

–आरोपी आणि त्याच्या पत्नीच्या जबाबात तफावत

दरम्यान, कोकरे हिच्या घरातून   दरोडेखोर पळून जाताना दिसून आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.  तर आरोपी  शेजाळ व त्याच्या पत्नीच्या बोलण्यात तफावत आढळून आली. परिणामी पोलिसांना संशय आल्याने त्याच्याकडे कसून चौकशी केली असता शेजाळ याचे नावे असलेली पाच एकर जमीन नावे करण्यासाठी अंगठा देत नसल्याच्या कारणावरून चाकूने गळयावर वार करून कोकरे हिचा  खून करून अज्ञात चोरटयाने खून केल्याचा बनाव केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

-पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
आरोपीने खूनाची कबुली दिल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.  पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील व अन्य पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.

Web Title: Murder of a woman to claim land accused in six hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2022 | 03:17 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Mangalvedha

संबंधित बातम्या

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
1

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

भरधाव वाहनातून दहशत निर्माण करणाऱ्यांना दणका! बारामती पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
2

भरधाव वाहनातून दहशत निर्माण करणाऱ्यांना दणका! बारामती पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!
3

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!

YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्…; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या
4

YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्…; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.