Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोरा समुद्रात मासेमारी नौका उलटून एकाचा मृत्यू तर दोघे बचावले, भावांचे प्रयत्न अयशस्वी

मृत वसंत यांच्या देहाचे मुरूड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वसंत कासारे विवाहित आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 21, 2023 | 11:45 AM
मोरा समुद्रात मासेमारी नौका उलटून एकाचा मृत्यू तर दोघे बचावले, भावांचे प्रयत्न अयशस्वी
Follow Us
Follow Us:

मुरुड जंजिरा : मुरूड जवळील मोरा गावच्या समुद्रात बुधवारी दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी मासेमारी नौका आकस्मिकपणे उलटून पाण्यात पडलेल्या वसंत धर्मा कासारे वय-३७ यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे समवेत त्यांचे भाऊ सुभाष कासारे आणि सुरेश कासारे यांनी पोहत किनारा गाठल्याने बचावले आहेत.

मुरूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी आठ वाजता वसंत कासारे, सुभाष कासारे आणि सुरेश कासारे हे तिघे सख्ये भाऊ फायबरची नौका घेऊन मोरा या भागातील समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. सकाळी पावसाबरोबरच वारा सुद्धा जोरात वाहू लागला होता. जोरदार वाऱ्यामुळे खोल पाण्यात गेल्यावर उसळत्या लाटांमुळे सदर नौका उलटून हे तिघे पाण्यात पडले. त्यांपैकी सुरेश आणि सुभाष यांनी पोहुन किनारा गाठला. आपला छोटा भाऊ वसंत याला देखील वाचविण्यासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले होते.

परंतु हे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. वसंत यांच्या नाका तोंडात पाणी शिरल्याने ते गुदमरले आणि त्यांचा मृत्यू झाला. हे तिघेही मोरा गावचे रहिवासी आहेत. मृत वसंत यांच्या देहाचे मुरूड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वसंत कासारे विवाहित आहेत. गणेशोत्सवात अशी दुर्दैवी घटना घडल्याने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. पोलीस निरीक्षक निशा जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जी ए धुमाळ पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Murud janjira raigad maharashtra a fishing boat overturned in the mora sea subhash kasare suresh kasare vasant kasare accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2023 | 11:28 AM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Government
  • Murud-Janjira

संबंधित बातम्या

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई
1

MSRTC News: अवैध प्रवासी वाहतुकीला लगाम; २० दिवसांत ₹१.६५ कोटींचा दंड, ८,८३९ वाहनांवर कारवाई

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी
2

विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणारे सदाभाऊ खोतच ‘गुंडाभाऊ’, विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागा; काँग्रेसची मागणी

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
3

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

CM Devendra Fadnavis : ‘अजित स्मृती अवित स्मृती’ या छायाचित्र प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट
4

CM Devendra Fadnavis : ‘अजित स्मृती अवित स्मृती’ या छायाचित्र प्रदर्शनाला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.