Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ससूनमध्ये ‘संगीत खुर्ची’ सुरू ; सहा महिन्यांत चौथा अधीक्षक नेमण्याची वेळ

ससून सर्वोपचार रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधीक्षक पदाची ‘संगीत खुर्ची’ सुरू आहे. विद्यमान अधीक्षक डॉ.किरणकुमार जाधव यांना हटवून आता त्यांच्या जागी डॉ.अजय तावरे यांची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे सहा महिन्यांत चौथा अधीक्षक नेमण्याचा विक्रम रुग्णालय प्रशासनाने केला. विशेष म्हणजे अधिष्ठातापदाचा कार्यभार डॉ.विनायक काळे यांनी स्वीकारल्यानंतर महिनाभरातच त्यांनी अधीक्षक बदलण्याचे पाऊल उचलले आहे.

  • By Aparna
Updated On: Dec 31, 2023 | 08:54 PM
Sassoon Hospital

Sassoon Hospital

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: ससून सर्वोपचार रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधीक्षक पदाची ‘संगीत खुर्ची’ सुरू आहे. विद्यमान अधीक्षक डॉ.किरणकुमार जाधव यांना हटवून आता त्यांच्या जागी डॉ.अजय तावरे यांची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे सहा महिन्यांत चौथा अधीक्षक नेमण्याचा विक्रम रुग्णालय प्रशासनाने केला. विशेष म्हणजे अधिष्ठातापदाचा कार्यभार डॉ.विनायक काळे यांनी स्वीकारल्यानंतर महिनाभरातच त्यांनी अधीक्षक बदलण्याचे पाऊल उचलले आहे.

ससूनच्या वैद्यकीय अध्यक्षपदी मे महिन्यात डॉ. यल्लपा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांना हटवून डॉ. सुनील भामरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर डॉ. भामरे यांच्याजागी सप्टेंबरमध्ये प्रमुख डॉ.किरणकुमार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. जाधव यांनी रुग्णालयाच्या प्रशासनातील गोंधळ दूर करीत सुसूत्रता आणली होती. याचबरोबर त्यांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी वक्तशीरपणा आणि शिस्तीचे पाऊल उचलले होते. याबद्दलही अनेक जण त्यांच्यावर नाराज होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

डॉ.अजय तावरे हे आधी अधीक्षकपदी होते. मूत्रपिंड प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी तावरे यांची मागील वर्षी एप्रिलमध्ये या पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांची या प्रकरणी विभागीय चौकशीही करण्यात आली होती. याचबरोबर डॉ. तावरे हे न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्याकडे एक पूर्णवेळ जबाबदारी असताना वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी आता देण्यात आली आहे. एकाच व्यक्तीकडे दोन पूर्णवेळ जबाबदाऱ्या सोपविणे चुकीचे आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

Web Title: Musical chair starts in sassoon time to appoint a fourth superintendent in six months nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2023 | 08:53 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Pune
  • pune news
  • Sassoon Hospital

संबंधित बातम्या

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
1

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन
2

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन

Atharva Sudame : रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! ‘त्या’ रिलवरुन PMPML ची थेट नोटीस
3

Atharva Sudame : रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! ‘त्या’ रिलवरुन PMPML ची थेट नोटीस

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.