मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना गटाबरोबर (Thackeray group) युतीची घोषणा झाली आहे. त्याआधी हे दोन नेते एका कार्यक्रमात एकत्र व्यासपीठावर आले होते. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत मुंबईतील ग्रॅन्ड हयात हॉटेलमध्ये बैठक झाली. जवळपास दिड तास दोन नेत्यामध्ये चर्चा झाली. युती झाल्यास आगामी समीकरणं तसेच जागावाटपाबाबत आज ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक वंचित बहुजन आघाडी व ठाकरे गटामध्ये झाली. त्यानंतर वंचितला महाविकास आघाडीमध्ये समविष्ट करुन घ्यायचे का, यावर मविआ नेत्यामध्ये बैठक होत आहे.
[read_also content=”रावसाहेब दानवे आणि प्रसाद लाड यांच्याविरोधात शिवप्रेमीकडून निषेध आंदोलन https://www.navarashtra.com/maharashtra/protest-movement-by-shivpremi-against-raosaheb-danve-and-prasad-lad-351164.html”]
दरम्यान, प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे यांच्यातील बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणाचा उदय होईल. तसेच भीमशक्ती व शिवशक्तीचा राजकीय क्षितिजावर उदय होईल असं राजकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दरम्यान, वंचितबाबत तसेच वंचितला मविआत समाविष्ट करुन घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीसाठी (MVA Meeting) उद्धव ठाकरे रवाना झाले आहेत.
उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात मविआच्या बैठकीला उपस्थित आहेत. तसेच ही बैठक विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती आमदार भाई जगताप यांनी दिली आहे. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत वंचितबाबत चर्चा होणार आहे. तसेच आगामी निवडणुकांबाबत काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत.