”प्रशांतला माझ्या शुभेच्छा”; अजित पवारांकडून पुण्याच्या जागेबाबत सूचक विधान
पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात काेणाची ताकद किती आहे, काेणाला किती मते पडली हाेती, याचा विचार महाविकास आघाडीच्या बैठकीत केला जाईल नंतरच पाेटनिवडणुकीच्या बाबत निर्णय हाेईल असे विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी नमूद केले. त्याचवेळी ‘माझ्या प्रशांतला शुभेच्छा आहेत, असे सुचक वक्तव्यही केले.
पुणे : पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात काेणाची ताकद किती आहे, काेणाला किती मते पडली हाेती, याचा विचार महाविकास आघाडीच्या बैठकीत केला जाईल नंतरच पाेटनिवडणुकीच्या बाबत निर्णय हाेईल असे विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी नमूद केले. त्याचवेळी ‘माझ्या प्रशांतला शुभेच्छा आहेत, असे सुचक वक्तव्यही केले.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात उभे करण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांवर जगताप यांचा भावी खासदार असा उल्लेख केला गेला आहे. यासंदर्भात पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले असता, त्यांनी खास शैलीत प्रतिक्रीया देताना ‘‘ माझ्या प्रशांतला शुभेच्छा आहे.
त्यांना पक्षाने महापाैर केले, शहराध्यक्ष पदावर बसविले, इतर पदेही त्यांना दिली आहेत. त्यांना शुभेच्छा देणाऱ्या फलकांवर त्यांचा भावी खासदार असा उल्लेख असला तरी मतदारसंघाचा उल्लेख नाही. परंतु पुणे शहर लाेकसभा मतदारसंघाची पाेटनिवडणुक झाली तर, महाविकास आघाडीच्या बैठकीत उमेदवारासंदर्भात अंतिम निर्णय हाेईल. या बैठकीत काेणत्या पक्षाची किती ताकद आहे, काेणत्या पक्षाला मागील निवडणुकीत किती मते मिळाली याचाही विचार केला जाईल.’’
Web Title: My best wishes to the pacific indicative statement from ajit pawar regarding pune seat nrdm